Syria War: सीरियात मृत्यू तांडव सुरुच; दोन दिवसांत मृतांचा आकडा हजारी पार( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: सध्या सीरियात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. सीरयातील लताकिया प्रांतात सुरक्षा दल आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल- असद यांच्या समर्थकांमध्ये मोठा संघर्ष सुरु झाला आहे. दरम्यान एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दल आणि असद समर्थकांमधील संघर्षात दोन दिवसांत हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बशर अल-असद सरकारचा सत्तापालट
गेल्या वर्षीच्या अखेरच्या महिन्यात हयात तहरीर अल-शाम (HTS) या विद्रोही गटाने सीरियाची राजधीन दमास्कवर ताबा मिळवला सत्तापलट झाले. त्यानंतर बशर अल-असद देश सोडून पळाला आणि रशियात आश्रय घेतला. त्यानंतर सीरियात हयात तहरीर अल-शामच्या विद्रोही गटाची सत्ता स्थापन झाली.
पुन्हा गृहयुद्धाचा भडका
नंतर पुन्हा एकदा सीरियाच्या लताकिया प्रांतात असद समर्थकांनी सुरक्षा दलांवर हल्ला करुन हिसांचार घडवून आणला. या संघर्षाची सुरुवात सुरक्षा दलांनी असद समर्थकांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर झाली. यामुळे सरकारने लताकिया आणि टार्टस येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. सध्या या भागात कर्फ्यू लागू करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे.
अल-जुलानी समोर मोठी आव्हाने
लताकिया आणि टार्टस क्षेत्र अलवाइट समुदायाचे तळ असून, अलवाइट ही एक मुस्लिम शिया शाखा आहे. ही शाखा पूर्वीचे सरकार बशर अल-असदची समुदायची होती. या भागातील हिंसाचारामुळे अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनचे पुन्हा पाकिस्तानवर उपकार; दया दाखवत घेतला मोठा ‘हा’ निर्णय