Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेलेन्स्कींना फसवत आहेत ट्रम्प? रशिया कीववर डागतोय क्षेपणास्त्र, पण युक्रेनला ‘हे’ शस्त्र वारण्याची नाही परवानगी, कारण काय ?

Russia Ukraine War update : रशिया आणि युक्रेन युद्धाला जवळपास तीन वर्षे उलटून गेली आहेत. सध्या हे युद्ध अधिक तीव्र होत आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहे. यामुळे युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2025 | 11:20 PM
US blocked Ukraine from firing long range missiles on Russia

US blocked Ukraine from firing long range missiles on Russia

Follow Us
Close
Follow Us:

Russia Ukraine War news in Marathi : कीव/मॉस्को :  सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War)अधिक तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकंवर हल्ले करत आहे. नुकतेच युक्रेनने त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त २४ ऑगस्ट रोजी रशियाच्या न्यूक्लिअयर प्रोजेक्टवर हल्ला केला आहे. युक्रेनने या प्रोजेक्टवर १२ हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत. शिवाय रशियाने देखील युक्रेनच्या महत्वपूर्ण भागांवर ताबा मिळवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीच्या प्रयत्नात आहेत. परंतु या हल्ल्यांमुळे शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

पण याच वेळी जागतिक स्तरावर एक वेगळीच चर्चा सुरु आहे. सांगितले जात आहे की, युक्रेनने अमेरिकेकडून लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे खेरदी केली आहे. परंतु याचा वापर करण्यास त्यांना परवानगी नाही. यामुळे डोनाल्ड ट्रम्प वोलोडिमिर झेलेन्स्कींना (Volodymir Zelensky) फसवत आहेत. त्यांचा युद्ध संपवण्याचा कोणताही हेतू नाही अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर अमेरिकेच्या सरकारी वृत्तसंस्था वॉल स्ट्रीट जर्नलच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मोठा खुलासा केला आहे.

अमेरिकेवर ‘Tarrif Hike’ चा पहिला तडाखा; भारतासह युरोपीय देशांनी टपाल सेवा केली बंद

रशियावर ATACMS डागण्याची परवानगी नाही

अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनला रशियावर अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी नाही. सध्या हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पण युक्रेनने एकदा रशियाच्या आत असलेल्या लक्ष्यावर एटीएसीएमएस डागण्याची परवानगी मागितली होती. परंतु अमेरिकेने याला नकार दिला होता.

युक्रेनला अमेरिकेच्या परवानगीची गरज का आहे?

अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे देऊ केली आहे. पण अमेरिका आणि युक्रेनमध्ये झालेल्या संरक्षण करारानुसार, याचा वापर करण्यास युक्रेनला मनाई करण्यात आली आहे. युक्रेनला युरोपीय देशांनी दिलेली क्षेपणास्त्रेही यामध्ये सामील आहेत. पण अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या धोरण व्यवहारानुसार युक्रेनला ही शस्त्रे वापरण्याची परवानगी नाही. या करारानुसार, याचा अंतिम निर्णय अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेसेथ यांच्याकडे आहे.

अमेरिकेचा नकार का?

अमेरिकेच्या य नकारामुळे युक्रेन रशियाविरुद्ध लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरु शकत नाही. याच्या वापरामुळे युक्रेनचा युद्धात सहज विजय शक्य आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करायची आहे. त्यांची इच्छा आहे की, युक्रनने रशियाशी तडजोड करावी. ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपावयचे असेही व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन यांनी म्हटले आहे.

शिवाय ट्रम्प यांनी याचा युद्ध सुरु होण्याचा आरोपी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर केला आहे. त्याच्यामुळेच युक्रेनला केवळ बचाव करण्याची परवानगी आहे, प्रत्युत्तर देण्याची नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असाही दावा केला आहे. २०२० मध्ये ते राष्ट्राध्यक्ष असते तर युद्ध सुरुच झाले नसते.

पाकिस्तानात मिळणार बांगलादेशी विद्यार्थ्यांना शिक्षण, अधिकाऱ्यांनाही देणार ट्रेनिंग! दोन्ही देशांची नवी युती भारतासाठी धोकादायक?

Web Title: Us blocked ukraine from firing long range missiles on russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 11:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा
1

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा

रशियाने निभावली दोस्ती! भारतीय तरुणांच्या नोकरीसाठी खुली केली महत्त्वपूर्ण क्षेत्रे
2

रशियाने निभावली दोस्ती! भारतीय तरुणांच्या नोकरीसाठी खुली केली महत्त्वपूर्ण क्षेत्रे

ही दोस्ती तुटायची नाही! अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयावर ठाम
3

ही दोस्ती तुटायची नाही! अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयावर ठाम

फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, द्विपक्षीय संबंधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
4

फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, द्विपक्षीय संबंधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.