Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Blockade: ‘US Centcom’ मैदानात! आज संध्याकाळी 7:30 पासून होर्मुझमध्ये टाळेबंदी; इराणी अहंकाराला अमेरीकन नौदलच देणार उत्तर

US-Iran War : अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) सोमवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी सुरू केली असून, इराणी बंदरांना भेट देणाऱ्या सर्व जहाजांवर निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे जागतिक तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 08:58 AM
us centcom blockade strait of hormuz iran shipping restrictions trump orders 2026

us centcom blockade strait of hormuz iran shipping restrictions trump orders 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
  • इराणी बंदरांवर टाळेबंदी
  • इतरांना दिलासा, इराणला चपराक

US Centcom blockade Strait of Hormuz : जागतिक राजकारणातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ‘अवज्ञाकारी’ वृत्तीला उत्तर देण्यासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) अधिकृतपणे जाहीर केले आहे की, सोमवारपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीची (Strait of Hormuz) पूर्णपणे लष्करी नाकेबंदी केली जाईल. भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून ही टाळेबंदी लागू होणार असून, यामुळे संपूर्ण जगाच्या ऊर्जा बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

नाकेबंदीचे स्वरूप आणि वेळ काय आहे?

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई अमेरिकेतील ईस्टर्न टाईमनुसार सकाळी १० वाजता आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. या नाकेबंदीचे मुख्य उद्दिष्ट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सागरी व्यापार केंद्र उद्ध्वस्त करणे हे आहे. इराणच्या बंदरांना भेट देणारे कोणतेही जहाज, मग ते कोणत्याही देशाचे असो, त्याला या मार्गावरून जाण्यास मज्जाव केला जाईल. अरबी आखात आणि ओमानच्या आखातातील सर्व इराणी बंदरे आता अमेरिकन नौदलाच्या कडक पहाऱ्यात असतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Diplomatic War: 4,596 वर्षांचा तुरुंगवास? तुर्कियेचा नेतान्याहूंना दणका; इस्रायलनेही ‘कागदी वाघ’ म्हणत केली एर्दोगानची गुपितं उघड

ट्रम्प यांचा ‘टोल’ इशारा आणि सुरक्षित मार्ग

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथसोशल’वर या कारवाईचे संकेत दिले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जे देश किंवा जहाजे इराणला बेकायदेशीररित्या टोल किंवा शुल्क भरतील, त्यांना खुल्या समुद्रात कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “इराणला आर्थिक मदत करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.” मात्र, ही नाकेबंदी केवळ इराणशी संबंधित जहाजांसाठीच आहे. इराण व्यतिरिक्त इतर आखाती देशांच्या बंदरांवर जाणाऱ्या व्यापारी जहाजांना यातून सूट देण्यात आली आहे, जेणेकरून जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडणार नाही.

🚨The US military just officially CONFIRMED President Trump’s massive Naval blockade of the Strait of Hormuz will ACTIVATE at exactly 10AM ET tomorrow: CENTCOM: “The blockade will be enforced impartially against vessels of all nations entering or departing Iranian ports and… https://t.co/v6CZLLfMTt pic.twitter.com/8dlI5LpTEp — Morse Report (@MorseReport) April 12, 2026

credit – social media and Twitter

नौदलाचा कडक बंदोबस्त आणि मार्गदर्शक सूचना

सेंट्रल कमांडने व्यापारी जहाजांसाठी विशेष ‘नोटीस टू मरीनर्स’ (Notice to Mariners) जारी केली आहे. ओमानच्या आखातात कार्यरत असलेल्या जहाजांना अमेरिकन नौदलाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्रिज-टू-ब्रिज चॅनल १६ द्वारे ही जहाजे नौदलाशी संवाद साधू शकतात. तसेच, समुद्रात पेरलेले भूसुरुंग हटवण्याचे काम अमेरिका सातत्याने करत राहील, जेणेकरून मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळू शकेल. ही नाकेबंदी इराणच्या बंदरांसाठी ‘आर्थिक फास’ ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Ties : ‘ती’ मोदींची रणनीती! दिल्ली निमंत्रणानंतर PM बालेंद्र शाहांचा ‘Delhi Plan’ तयार; नेपाळची भारतासोबत खलबतं

जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात संवेदनशील व्यापारी मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्याचा २० टक्के भाग याच मार्गातून जातो. अमेरिकेच्या या निर्णयामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतासारख्या देशांसाठी, जे आपल्या ऊर्जेसाठी आखाती देशांवर अवलंबून आहेत, ही बातमी चिंताजनक आहे. जरी इतर देशांच्या जहाजांना सूट असली, तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे विम्याचे दर आणि मालवाहतुकीचा खर्च वाढण्याची भीती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी कधीपासून सुरू होत आहे?

    Ans: अमेरिकेची ही नाकेबंदी भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून (१३ एप्रिल २०२६) लागू होईल.

  • Que: या नाकेबंदीचा फटका कोणत्या जहाजांना बसेल?

    Ans: इराणच्या कोणत्याही बंदरावर जाणारी किंवा तिथून येणारी सर्व व्यापारी आणि खाजगी जहाजे या नाकेबंदीच्या कक्षेत येतील.

  • Que: इतर देशांच्या व्यापारावर याचा परिणाम होईल का?

    Ans: इराण व्यतिरिक्त इतर देशांच्या बंदरांकडे जाणारी जहाजे सुरक्षित राहतील, परंतु इराणला टोल भरणाऱ्या जहाजांवर अमेरिका कारवाई करणार आहे.

Web Title: Us centcom blockade strait of hormuz iran shipping restrictions trump orders 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Tiffany Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे राजस्थान कनेक्शन? ताजमहाल पाहून टिफनी ट्रम्प थेट जैसलमेरला रवाना; कारण आले समोर
1

Tiffany Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे राजस्थान कनेक्शन? ताजमहाल पाहून टिफनी ट्रम्प थेट जैसलमेरला रवाना; कारण आले समोर

Interstate 95: अमेरिकेत काळाचा भीषण घाला! भरधाव बसने 6 गाड्यांना चिरडले; एकाच कुटुंबातील 2 मुलांसह 5 जणांचा वेदनादायक अंत
2

Interstate 95: अमेरिकेत काळाचा भीषण घाला! भरधाव बसने 6 गाड्यांना चिरडले; एकाच कुटुंबातील 2 मुलांसह 5 जणांचा वेदनादायक अंत

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार
3

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद
4

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.