US deploy nuclear weapons in Lakenheath base, report says
वॉशिंग्टन: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका ब्रिटनमध्ये आपली अण्वस्त्रे तैनात करण्याची योजना आखत आहे. फेडरेशन ऑफ सायंटिस्ट्स(FAS)च्या अहवालानुसार अमेरिका दोन दशकांनंतर म्हणजे सुमारे 17 वर्षांनतर आपली अण्वस्त्रे अमेरिकेत तैनात करणार आहे. हा धक्कादायक खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे.
ब्रिटनमधील लॅकेनहीथ बेसवर परमाणु शस्त्रांची तयारी सुरु
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सैफॉक भागात असलेल्या RAAF लॅकेनहीथ या अमेरिकन लष्करी तळाच्या ठिकाणी 22 अणु बंकरचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या बंकरमध्ये भूमिगत कक्ष असून प्रत्येकात चार अण्वस्त्रे ठेवण्याची क्षमता आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, युरोपमधील अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा एअरबेस म्हणून लॅकेनहीथ आहे. या एअरबेसवर F-15 स्ट्राइत ईगल आणि F-35A लाइटनिंग II हे अण्वस्त्र सक्षम लढाऊ विमान तैनात आहेत.
रशियानेही प्रत्युत्तरदाखल घेतला हा निर्णय
अमेरिकेच्या ब्रिटनमधील या वाढत्या हालचाली पाहाता याला उत्तर म्हणून रशियानेही आपल्या पश्चिम भागात अनेक अण्वस्त्र तैनात केली आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या घडमोडी घडत आहे. यामुळे अमेरिका आणि रशियात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेत वाढ झाली आहे.
ब्रिटनमध्ये अमेरिकेच्या अणु तळांचे अपग्रेडेशन
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने 2021 मद्ये लॅकेनहीथची अणु शस्त्रक्षमता पुन्हा अपग्रेड करम्याचा निर्णय घेताला होता. रशिया युक्रेन युद्धनंतर या योजनेला अधिक गती प्राप्त झाला. नाटोच्या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये विशेष शस्त्र स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अमेरिकेने 2021 मध्ये लॅकेनहीथमध्ये परमाणु शस्त्रक्षमता पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला होता.
रशिया-युक्रेन युद्धानंतर या योजनेला अधिक गती मिळाली. नाटोच्या दस्तऐवजानुसार, ब्रिटनला ‘विशेष शस्त्र’ स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या या पावलांमुळे पाश्चात्य देशांच्या अणुसाठ्याची सुरक्षा वाढेल. तसेच रसियाच्या लष्करी रणनितीवर परिणाम होण्याची शक्यता देखील अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे.
सध्या अमेरिकेने इटली, तुर्की बेल्जियम, नेदरलॅंडस आणि जर्मनीतील हवाई तळांवर सुमारे 100 US B-61-12 बॉम्ब साठे साठवण्यात आले आहेत. या बॉम्बची क्षमता 50 किलोटन पर्यंत असून हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 3 पट जास्त शकक्तिशाली आहे.
रशियाचा इशारा
1954 मध्ये RAAF लॅकेनहीथ युकेच्या तळांवर तैनात करण्यात आली होती. मात्र, 2008 मध्ये, तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ती हटवण्याचा निर्णय घेतला. आता ही शस्त्रे पुन्हा तैनात करण्याच्या हालचालींवर रशियाने नाराजी व्यक्त केली आहे. रशियाच्या क्रेमलिन कार्यालयाने या निर्णयावर टीका करताना म्हटले आहे की, “ही हालचाल जागतिक तणाव वाढवणारी आहे आणि योग्य वेळी आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.”