Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध

US Lifts Sanction on Syria : सीरियासाठी एक आनंदाचे वृत्त आहे. सीरियाच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिकेने सीरियावरील सर्व कठोर निर्बंध हटवले आहेत. सीरियाच्या विकासासाठी हे एक मोठे पाऊल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 10:45 AM
US permanently lifts sanctions on Syria

US permanently lifts sanctions on Syria

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प सीरियावर मेहरबान
  • अमेरिकेने हटवले सर्व निर्बंध
  • सीरियाच्या पूनर्बांधणीसाठी नवी दिशा
America Lifts Ban on Syria : दमास्कस : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह आता सीरियावरही दया दाखवण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी सीरियावरील सर्व कठोर निर्बंध कायमचे हटवले आहेत. यामुळे सीरियाच्या पुनर्बांधणीसाठी एक नवी दिशा मिळाली आहे. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या सीरियामध्ये बंडखोर गट हयात-तहरीर-अलशाम (HTS) या गटाची सत्ता आहे.

सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर ISIS चा हल्ला ; ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त, म्हणाले…

ट्रम्प यांनीच पहिल्या कार्यकाळात घातली होती बंदी

धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात २०१९ मध्ये सीरियावर बंदी घातली होती. २०११ मध्ये सीरियात गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर असद यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याने सीरिया सरकार वर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. दरम्यान डिसेंबर २०२४ मध्ये HTS च्या बंडखोर गटाने बशरच्या सत्तेविरोधात धावा बोलला आणि त्याची सत्ता उलटून टाकली.

त्यानंतर HTS गटचा प्रमुख अल-जुलानी यांनी सत्ता हाती घेतली.  तेव्हापासून सीरियाच्या विकासासाठी ते प्रयत्न करत आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांची सौदी अरेबिात भेट घेतली होती. अमेरिका दौऱ्याचेही त्यांना आमंत्रण दिले होते. सध्या सीरियावरील निर्बंध हटवले जाक असून त्याच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न सुरु आहे. अमेरिकेने निर्बंध हटवल्याने सीरियामध्ये पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यास सुरुवात होईल. तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकही वाढेल.

सीरियावरील सर्न निर्बंध बिनशर्त हटवण्यात आले

ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत सीरियावरी निर्बंध तात्पुरते उठवले होते, परंतु गुरुवारी (१८ डिसेंबर) त्यांनी सीरियावरील निर्बंध उठवण्याच्या निर्णयाला अंतिम मान्यत दिली आहे. याला काही सुन्नी मुस्लिमांनी विरोध करण्याचा, अटी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु सीरियावरील सर्व निर्बंध बिनशर्त हटवण्यात आले आहे. मात्र अद्यापही दहशतवादविरोधी उपाय आणि अल्पसंख्यांकाच्या हक्कांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सीरियाने मानले अमेरिकेचे आभार

दरम्यान सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. सीरियाने म्हटले आहे की, सीरियन लोकांवरील ओझे कमी करण्यासाछी आणि त्याच्या स्थिरतेसाठी, पुनर्बांधणीसाठी एक नवा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल अमेरिकेचे आभार मानतो. तसेच सीरियामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो असे सीरियाने म्हले आहे.

ब्रिटननेही उठवली बंदी

याशिवाय अमेरिकेसोबत ब्रिटनने देखील सीरियावरील वित्तीय संस्थांवरील सर्वसमावेश निर्बंध उठवले आहेत. परंतु नागरिकांविरोधात हिंसाचारात सहभागी असलेवल्या संघटना आणि व्यक्तींवरी कठोर निर्बंध लादले आहेत. दरम्यान सौदी अरेबिया आणि तुर्की, कतारने अमेरिका आणि ब्रिटनच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेत.

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने सीरियावरील निर्बंध का हटवले?

    Ans: सीरियामध्ये बशरच्या सत्तापालटानंतर नवीन सरकारला पुनर्बांधणीसाठी अडथळा येत होता, परंतु अमेरिकेने निर्बंध हटवत हे सर्व अडथळे दूर केले आहेत. यामुळे सीरियात गुंतवणूक वाढेल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.

  • Que: अमेरिकेच्या या निर्णयाचा सीरियावर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकेने सीरियावरील हटवलेल्या निर्बंधामुळे सीरियाच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढेल, तसेच युद्धग्रस्त देशाच्या पुनर्बांधणीसाठी गती मिळेल.

Web Title: Us donald trump permanently lifts sanctions on syria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
1

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
2

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे

भारतीय कामगारांसाठी खुश खबर! सौदी अरेबियाने परदेशी टॅक्स केला रद्द; ‘या’ क्षेत्रातील मजुरांना मिळणार दिलासा
3

भारतीय कामगारांसाठी खुश खबर! सौदी अरेबियाने परदेशी टॅक्स केला रद्द; ‘या’ क्षेत्रातील मजुरांना मिळणार दिलासा

न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ ला दिला हिरवा कंदील
4

न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ ला दिला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.