दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Syria President Al-Julani US Visit : वॉशिंग्टन : एक मोठे वृत्त समोर आले आहे. ज्या व्यक्तीला अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले होते, त्याला दहशतवाद्याच्या ब्लॅक लिस्टमधून काढून टाकले आहे. शिवाय ही व्यक्ती अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीरियाच्या अंतरिम सरकारचे अध्यक्ष अहमद अल-जुलानी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (०८ नोव्हेंबर) रोजी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले आहेत.
भीषण दुर्घटना! तुर्कीच्या परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO
येथे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचीही भेट घेणार आहेत. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने याची माहिती दिली. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अल-जुलानी सोमवारी (१० नोव्हेंबर) ट्रम्प यांची भेट घेतील. १९४६ च्या स्वातंत्र्यानंतर सीरियाच्या अध्यक्षांचा अमेरिकेला हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे अल-जुलानी यांची भेट घेतली आहे. मे २०२५ मध्ये ही भेट झाली होची. यावेळी ट्रम्प यांनी जुलानी यांच्याकडे, सीरिया इस्लामिक स्टेट विरुद्ध लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय युतीमध्यटे सामील होईल. हे युती अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली आहे. या दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
सीरिया-अमेरिका संबंधात वाढ
सीरियाच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अल-जुलानी सरकार अमेरिकेच्या मागण्या पुर्ण करत आहे. यामध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकन लोकांचा शोध आहे. तसेच रायानिक शस्त्रे नष्ट करणे या अटींचा समावेश आहे. शिवाय अमेरिका सीरिया आणि इस्रायलमध्येही समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सीरियाची राजधानी दमास्कसजवळ अमेरिकेने लष्करी तळ उभारण्याची योजना देखील आखली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये बशर अल-असद यांना सीरियातून आपली सत्ता सोडून पळून जावे लागले होते. सीरियाची राजधानी दमास्कसवर बंडखोर गटांनी ताबा मिळवला होता. यामध्ये असद राजवटीला सत्तेतून हटवण्यात आले होते. सध्या बंडखोर गट अल-हयात तरहीर या गटने आपली सत्ता स्थापन केली असून अल-जुलानी त्यांचे नेतृत्त्व करत आहे. या नेतृत्त्वाने सीरियामध्ये प्रगतीची पावले उचलली आहे. यामुळेच अमेरिकेने अल-जुलानी यांना ब्लॅक लिस्टमधून काढून टाकले असल्याचे म्हटले आहे. सीरियामध्ये शांतता आणि स्थिरता निर्माण झाली आहे.
दरम्यान अल-जुलानी यांनी वॉशिंग्टनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेचा दौरा करणारे ते पहिले सीरियाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सीरियावरील निर्बंध उठवण्याची मागणी केली. अमेरिकेने देखील हयात तहरीर अल-शाम (HTS) संघटनेला जुलै महिन्यात दहशतवादी संघटनेच्या यादीत काढून टाकले आहे. सध्या १३ वर्षांच्या गृहयुद्धानंतर सीरियामध्ये पुनर्बांधणीचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. यासाठी अमेरिका मदत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठीच जुलानी यांचा हा दौरा आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश






