सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर ISIS चा हल्ला ; ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१३ डिसेंबर) सीरियाच्या पालमिरा प्रदेशात इस्लामिक स्टेट (ISIS) च्या एका गटाने हा हल्ला केला आहे. ISIS च्या बंदुकधारी गटाने अमेरिकेच्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला असून यामध्ये तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत, तर २ सैनिक आणि १ दुभाषीकाचा मृत्यू झाला आहे. सध्या जखमींची प्रकृती गंभीर आहे. बशर अल-असदच्या सत्तापालपालटानंतर सीरियात अमेरिकन सैन्यावर झालेला हा या वर्षातील पहिलाच हल्ला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त करत सीरियाला इशारा दिला आहे. दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या धोरणानुसार, अमेरिकन सैन्याने मृतांची ओळख गुप्त ठेवली आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर या संदर्भात पोट केली आहे. त्यांनी सीरियातील झालेल्या हल्ल्यावर बोलतना म्हटले की, सीरियामध्ये तीन महान अमेरिकन देशभक्तांच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो. तसेच त्यांनी जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. नुकतेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ट्रम्प यांनी ISIS चा हा हल्ला अमेरिका आणि सीरियावरील हल्ला असून याचा कठोर बदला घेतला जाईल असेही म्हटले आहे.
या वेळी सीरियाच्या अंतरिम सराकरचे प्रमुख अल-जुलनी यांनी देखील या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांना या हल्ल्याचा बदला घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी देखील या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आहे की, अमेरिकी सैन्य हल्लेखोरांना शोधून काढेल आणि कठोर शिक्षा देईल. अमेरिका लवकरच या प्रकरणाचा प्रतिशोध घेईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Ans: अमेरिकेच्या सीरियातील पालमिरा प्रदेशातील लष्करी तळावर हल्ला झाला आहे.
Ans: शनिवारी (१३ डिसेंबर) सीरियाच्या पालमिरा प्रदेशात इस्लामिक स्टेट (ISIS) च्या एका बंदुकधारी गटाने अमेरिकेच्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला आहे.
Ans: ISIS च्या अमेरिकन तळावरील हल्ल्यात २ सैनिक आणि १ दुभाषीकाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाले आहेत.
Ans: ISIS च्या अमेरिकन तळावरील हल्ल्यावर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.






