
us e3 awacs plane destroyed prince sultan air base iran missile attack 2026
US E-3 AWACS plane destroyed Iran : मध्य-पूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता अशा वळणावर आले आहे जिथे दररोज विनाशाच्या नवीन कथा लिहिल्या जात आहेत. सौदी अरेबियातील अमेरिकेचा सर्वात सुरक्षित मानला जाणारा ‘प्रिन्स सुलतान हवाई तळ’ (Prince Sultan Air Base) इराणच्या क्षेपणास्त्रांनी हादरवून सोडला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे सर्वात महत्त्वाचे ‘हवाई कमांड सेंटर’ मानले जाणारे E-3 AWACS विमान नष्ट झाले असून, अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला हा इराणने दिलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
E-3 AWACS (Airborne Warning and Control System) हे केवळ एक विमान नाही, तर ते ‘आकाशातील चालते-फिरते रडार’ आहे. बोईंग ७०७ वर आधारित हे विमान २५० मैलांच्या परिघात शत्रूची विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे टिपू शकते. युद्धभूमीवर लढाऊ विमानांना दिशा दाखवणे आणि समन्वय साधण्याचे काम हे विमान करते. निवृत्त कर्नल जॉन वेनेबल यांच्या मते, हे विमान नष्ट झाल्यामुळे आता या संपूर्ण परिसरात शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची अमेरिकेची क्षमता निम्मी झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला. ज्यावेळी हे क्षेपणास्त्र तळावर आदळले, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले किमान १२ अमेरिकन नागरिक जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्षात आतापर्यंत एकूण ३०३ अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. हे आकडे अमेरिकेसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.
🔥 At least 2 American E-3 aircrafts destroyed at Prince Sultan Air Base Saudi Arabia, and there are only 16 of these aircraft in the United States. pic.twitter.com/7cnj8FY2iG — True Promise – الوعد الصادق ✪🇮🇷 (@IRTruePromise) March 29, 2026
credit – social media and Twitter
इराणच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत आहेत. पेंटागॉनने ट्रम्प यांना १०,००० अतिरिक्त भूदल (Ground Troops) मध्य-पूर्वेत पाठवण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, २७ मार्च रोजीच ३,५०० मरीन सैनिक ‘USS त्रिपोली’ या जहाजावरून या युद्धग्रस्त क्षेत्रात दाखल झाले आहेत. अमेरिका आता केवळ हवाई हल्ल्यांवर न थांबता, थेट जमिनीवरून इराणला घेरण्याची रणनीती आखत असल्याचे दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Ties: ‘तो तर फक्त ट्रेलर होता’ बालेन शाह ‘ॲक्शन मोडमध्ये येताच PM मोदींना पाठवला संदेश; वाचा नेमके काय म्हटले?
प्रिन्स सुलतान तळावर झालेला हा हल्ला अमेरिकेच्या प्रतिष्ठेला लागलेला मोठा तडा आहे. इराणने ज्या पद्धतीने अमेरिकेची ‘अवाक्स’ यंत्रणा निकामी केली, त्यावरून इराणची तयारीही कमी नाही हे स्पष्ट होतेय. आता ६ एप्रिलची डेडलाईन जवळ येत असताना, अमेरिका या विमानाचा बदला घेण्यासाठी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Ans: हे विमान नष्ट झाल्यामुळे अमेरिकेची हवाई निगराणी आणि युद्धभूमीवरील समन्वय यंत्रणा कमकुवत झाली असून, शत्रूच्या हालचाली टिपणे आता कठीण होईल.
Ans: हा हवाई तळ सौदी अरेबियात असून, अमेरिकेच्या मध्य-पूर्वेतील हवाई कारवाया, इंधन भरणे आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी हे मुख्य केंद्र आहे.
Ans: CENTCOM च्या ताज्या अहवालानुसार, आतापर्यंत एकूण ३०३ अमेरिकन सैनिक या संघर्षात जखमी झाले आहेत.