India Nepal Friendship: 'पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास उत्सुक…' नेपाळच्या नव्या पंतप्रधानांकडून संदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Balen Shah Nepal Prime Minister 2026 : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये सध्या राजकीय भूकंप आला आहे. काठमांडूचे तरुण महापौर म्हणून जगभरात गाजलेले बलेंद्र शाह ऊर्फ ‘बालेन शाह’ (Balen Shah Nepal PM) आता नेपाळचे नवे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती भवनात त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. पण ही बातमी केवळ शपथविधीपुरती मर्यादित नाही. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच भारताशी असलेले संबंध सुधारण्यावर भर दिला आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत राजकारणात ‘क्लीनअप मोहीम’ राबवत माजी पंतप्रधानांनाच तुरुंगात धाडले आहे.
नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या रूपाने एका तरुण नेतृत्वाचा उदय झाल्याबद्दल भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदींनी ट्विट करत आशा व्यक्त केली की, शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि नेपाळमधील प्राचीन मैत्री अधिक दृढ होईल. या शुभेच्छांना उत्तर देताना पंतप्रधान बालेन शाह यांनी शनिवारी विशेष आभार मानले. “पंतप्रधान मोदीजी, तुमच्या स्नेहाबद्दल धन्यवाद. दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास अत्यंत उत्सुक आहे,” असे बालेन शाह यांनी ‘X’ वर पोस्ट करत स्पष्ट केले. या विधानामुळे भारत-नेपाळ संबंधांमध्ये पुन्हा एकदा गोडवा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Thank you, PM @narendramodi for your kind words and warm wishes. I am eager to work closely with you to advance the multifaceted relations between our two countries for the common prosperity of our people. https://t.co/0YWdh8Jj36 — PMO (@PM_nepal_) March 28, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : येमेनची रणमैदानात उडी! अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला, 5 भारतीय जखमी; इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास
बालेन शाह यांनी सत्तेत येताच दाखवलेला ‘रुद्रावतार’ पाहून संपूर्ण नेपाळ थक्क झाले आहे. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक केली आहे. चौकशी आयोगाच्या अहवालानुसार, या नेत्यांनी आपल्या कार्यकाळात आंदोलने हाताळताना गंभीर निष्काळजीपणा केला होता, ज्यामुळे जीवितहानी झाली होती. या प्रकरणात दोषी आढळल्यास ओलींना १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. एका माजी पंतप्रधानाला अशा प्रकारे अटक होणे, ही नेपाळच्या इतिहासातील मोठी घटना मानली जात आहे.
केवळ राजकीय नेतेच नाही, तर बालेन शाह सरकारने आता भ्रष्ट आणि निष्काळजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धही मोहीम उघडली आहे. आंदोलनादरम्यान गोळीबार आणि बळाचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत नेपाळमधील अनेक वरिष्ठ आयपीएस दर्जाचे अधिकारी तुरुंगात दिसू शकतात. बालेन शाह यांनी आपल्या कृतीतून स्पष्ट संदेश दिला आहे की, “कायद्यापेक्षा मोठा कोणीही नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS 2026: ‘आमच्याकडे आलात तर याद राखा!’ इराणचे UAE ला थेट युद्ध-आव्हान; भारत दोन्ही शत्रूंना आणणार एकाच टेबलावर
बालेन शाह यांची कार्यशैली ‘ॲक्शन मोड’साठी ओळखली जाते. महापौर असताना त्यांनी काठमांडूचा चेहरामोहरा बदलला होता, आता पंतप्रधान म्हणून ते नेपाळची प्रतिमा कशी बदलतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारतासोबतची जवळीक आणि देशांतर्गत भ्रष्टाचारावर केलेली कारवाई यामुळे बालेन शाह यांची लोकप्रियता आकाशाला भिडली आहे. मात्र, के.पी. शर्मा ओलींसारख्या बलाढ्य नेत्याला तुरुंगात धाडल्यामुळे नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होणार की बालेन शाह ही परिस्थिती हाताळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Ans: बलेंद्र शाह (बालेन शाह) हे नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत, ज्यांनी २७ मार्च २०२६ रोजी शपथ घेतली.
Ans: आंदोलनादरम्यान कर्तव्यात कसूर केल्याचा आणि निष्काळजीपणाचा आरोप चौकशी आयोगाने ठेवल्यामुळे बालेन शाह सरकारच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यात आली.
Ans: पंतप्रधान मोदींनी अभिनंदनाचे ट्विट केले होते, त्यावर बालेन शाह यांनी भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त करत आभार मानले.






