Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? कोणाचा विजय भारत संबंधासाठी अधिक चांगला; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केली भूमिका

अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या मतदानाला सुरूवात झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2024 | 10:41 AM
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? कोणाचा विजय भारत संबंधासाठी अधिक चांगला; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केली भूमिका
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: मंगळवारपासून अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या मतदानाला सुरूवात झालेली आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे.अनेकांचे लक्ष या निवडणुकीत कोण जिंकले याकडे लागलेले आहे. दरम्यान अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्याबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील सकारात्मक भूमिका मांडली आहे. मात्र, कोण जिंकले तरी, भारत-अमेरिकन संबंध दृढ होण्याचे संकेत आहेत, असे जयशंकर यांनी सांगितले.

द्विपक्षीय संबंधांसाठी भारताचा विश्वास कायम

ऑस्ट्रेलियातील समकक्ष पेनी वोंग यांच्यासोबत पत्रकार परिषदेत असताना एस जयंशकर यांना अमेरिका-भारत संबंधांवर प्रश्न विचारला गेला. त्यावेळी एस. जयशंकर यांनी गेल्या पाच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधांमध्ये “स्थिर प्रगती” झाल्याचा उल्लेख केला. एस. जयशंकर यांनी म्हटले की, अमेरिकन निवडणुकीमध्ये निकाल कोणाच्याही बाजूने, परंतु द्विपक्षीय संबंधांसाठी भारताचा विश्वास कायम आहे.

हे देखील वाचा- अंतराळातून सुनिता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी करू शकणार मतदान; जाणून घ्या कसे

अमेरिकेतील राजकीय बदलांचा भारत-अमेरिका धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही- एस. जयशंकर

अमेरिकेत सुरू असलेली अध्यपदाची निवडणूक भारतासाठी महत्त्वाची आहे. भारताचे परराष्ट्र धोरण जागतिक पटलावर मजबूत करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. अमेरिका-भारत संबंधांमध्ये स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी जयशंकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे अमेरिकेतील राजकीय बदलांचा भारत-अमेरिका धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जयशंकर यांनी मांडली आहे.

एस. जयशंकर यांनी क्वाडबद्दलही आशावाद व्यक्त केला

याशिवाय क्वाडबद्दलही त्यांनी आशावाद व्यक्त केला. क्वाडमध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचा समावेश आहे आणि चीनच्या आक्रमक धोरणाला प्रत्युत्तर म्हणून हा गट तयार करण्यात आला होता. एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात क्वाडच्या पुनरुज्जीवनाचा दाखला देत सांगितले की, ट्रम्प अध्यक्ष असताना 2017 मध्ये क्वाडला नवे जीवन मिळाले. त्यानंतर कोविड काळातही क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक दुर्मिळ बैठक 2020 मध्ये टोकियो येथे झाली. यामुळे दोन्ही पक्षांकडून पुढे होणाऱ्या अध्यक्षीय बदलांचा क्वाडवर फारसा परिणाम होणार नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले. वोंग यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, क्वाडचे महत्त्व निवडणुकांच्या निकालापलीकडे टिकवून ठेवले जाईल.

हे देखील वाचा- हत्ती विरूद्ध गाढव! रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाची ‘ही’ चिन्हे कशी खास बनली? जाणून घ्या मनोरंजक कथा

Web Title: Us election 2024 kamala harris or donald trump whose victory is better for india s jaishankar replied nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Kamala Harris
  • S. Jaishankar
  • US election 2024

संबंधित बातम्या

Brigitte Macron: ‘ट्रम्प आपल्या मर्यादा विसरले!’ पत्नीबद्दलच्या ‘त्या’ घाणेरड्या कमेंटमुळे मॅक्रॉन भडकले; अमेरिका आता एकटी पडणार?
1

Brigitte Macron: ‘ट्रम्प आपल्या मर्यादा विसरले!’ पत्नीबद्दलच्या ‘त्या’ घाणेरड्या कमेंटमुळे मॅक्रॉन भडकले; अमेरिका आता एकटी पडणार?

US Politics: ट्रम्प प्रशासनात सत्तेचा रणसंग्राम! अमेरिकेत एका रात्रीत 3 बड्या नेत्यांची हकालपट्टी; काश पटेल, तुलसी गबार्ड रडारवर
2

US Politics: ट्रम्प प्रशासनात सत्तेचा रणसंग्राम! अमेरिकेत एका रात्रीत 3 बड्या नेत्यांची हकालपट्टी; काश पटेल, तुलसी गबार्ड रडारवर

Tariff Bomb : ‘आमच्याकडे कारखाने उभारा, नाहीतर 100% टॅरिफ भरा’ डोनाल्ड ट्रम्पनी पुन्हा जगाला दाखवला कराचा माज
3

Tariff Bomb : ‘आमच्याकडे कारखाने उभारा, नाहीतर 100% टॅरिफ भरा’ डोनाल्ड ट्रम्पनी पुन्हा जगाला दाखवला कराचा माज

Crypto मार्केटमध्ये भूकंप! 24 तासांत 7.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान, कोणत्या चलनाचे सर्वाधिक नुकसान झाले?
4

Crypto मार्केटमध्ये भूकंप! 24 तासांत 7.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान, कोणत्या चलनाचे सर्वाधिक नुकसान झाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.