फोटो सौजन्य: Shutterstock
वॉश्गिटन: अमेरिकेच्या 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन राहिल्या आहे. रिपल्बिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्ष्याच्या उमेदवार यांच्यात ही लढत पाहायला मिळत आहे. हे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. ही चिन्हे अमेरिकन राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण तुम्हाला माहित आहे का हीच चिन्हे का निवडण्यात आली? कोणी ही चिन्हे राजकीय विचारसरणीशी जोडली? तर यामागे मनोरंजक असा इतिहास आहे.
चला तर मग आम्ही तुम्हाला अमेरिकेच्या निवडणुकीशी संबंधित हत्ती आणि गाढवाची रंजक गोष्ट सांगू.
रिपब्लिकन पक्षाचे हत्ती चिन्ह
तर मिळालेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती बनण्याची घटना 7 नोव्हेंबर 1874 रोजी घडली. थॉमस नॅस्ट या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराने हार्पर वीकली या मासिकात “रिपब्लिकनला मतदान करताना” हत्तीचे चित्रण असलेले व्यंगचित्र प्रकाशित केले होते. नॅस्टने या व्यंगचित्रात रिपब्लिकन पक्षाचे गुणविशेष, म्हणजे सामर्थ्य, स्थिरता आणि भक्कम धोरणांचे प्रतीक म्हणून हत्तीचा वापर केला. हा प्राणी जसा शक्तिशाली असतो, तसाच रिपब्लिकन पक्षही दृढ आहे, असा संदेश देण्याचा नॅस्टचा उद्देश होता. हे चिन्ह रिपब्लिकन पक्षासाठी लोकप्रिय झाले. त्यानंतर हत्ती हे रिपब्लिकन पक्षाची ओळख बनले.
डेमोक्रॅटिक पक्षाचे गाढव चिन्ह
तर गाढवाचे चिन्ह डेमोक्रॅटिक पक्षाशी जोडले गेले. यामागे देखील एक मनोरंजक कथा आहे. त्याच्यामागे अध्यक्षीय उमेदवार अँड्र्यू जॅक्सनशी संबंधित कथा आहे. 1828 च्या निवडणुकीत जॅक्सनच्या विरोधकांनी त्याला “जॅकस” (गाढव) म्हणत अपमानित केले. मात्र, जॅक्सनने या अपमानास्पद संबोधनाला सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले आणि प्रचारात गाढवाचा वापर केला. 1870 च्या दशकात थॉमस नास्टने आपल्या व्यंगचित्रांमध्ये गाढवाचे रूपक म्हणून वापर सुरू ठेवले. त्यामुळे गाढवाचे प्रतिकात्मक महत्त्व वाढले. साधेपणा, कष्टाळूपणा आणि सर्वसामान्य लोकांसाठी असलेली निष्ठा, या गुणांचा गाढवाशी संबंध आहे. यामुळे गाढव हे डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह बनले.
अमेरिकन राजकारणाला एक विशिष्ट ओळख
हत्ती आणि गाढव ही दोन्ही चिन्हे आता अमेरिकन राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग बनलेली आहेत. हत्ती हे रिपब्लिकन पक्षाच्या पुराणमतवादी विचारांचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे, तर गाढव डेमोक्रॅटिक पक्षाच्या सामान्य लोकांसाठी असलेल्या निष्ठेचे, पुरोगामी विचारांचे प्रतीक आहे. या चिन्हांनी अमेरिकन राजकारणाला एक विशिष्ट ओळख दिली आहे.