फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुका आज पार पडतील. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनालड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील प्रत्येक नागरिक आपला मतदानचा हक्क बजावत आहे. यामध्ये नासाचे अंतराळात कार्यरत असेलेल अंतराळवीरही मागे नाहीत. यावर्षी दोन अमेरिकन अंतराळवीर, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा समोवेश आहे. आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकातन हे अंतराळवीर मतदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असे की, अंतराळात असताना सुनिता विल्यम्स मतदान कसे करणार. तर अंतराळात असतानाही मतदानाची सोय करून नासाने ही प्रक्रिया सुलभ केली आहे.
मतदानाची प्रक्रिया कशी असेल?
नासाने 1997 मध्ये अंतराळातून मतदान करण्याची सुविधा सुरू केली. होती अंतराळवीरांना मतदानासाठी एक इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. निवडणुकीच्या आधी मत देणे अपेक्षित आहे ती मतपत्रिका तयार केली जाते. ही इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका अंतराळ स्थानकावर सॅटेलाइटद्वारे पाठवली जाते. नंतर, अंतराळवीर या मतपत्रिकेवर मतदान करतात, आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवली जाते. अंतराळवीराचे मत नासाच्या अधिकृत प्रणालीद्वारे पृथ्वीवर पाठवले जाते. आणि नंतर ते संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना हस्तांतरित केले जाते.
सुनीता विल्यम्सच्या भावना
सप्टेंबरमध्ये नासाच्या पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी सांगितले की, “नागरिक म्हणून मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि मी अंतराळातून मतदान करण्यास उत्सुक आहे.” या विधानातून मतदानाविषयी त्यांची निष्ठा स्पष्ट होते.
अंतराळातून मतदानाचा इतिहास
1997 मध्ये नासाचे अंतराळवीर डेव्हिड वुल्फ अंतराळातून मतदान करणारे पहिले अमेरिकन ठरले. त्यानंतर, केट रुबिन्स यांनी 2020 च्या निवडणुकीत अंतराळ स्थानकावरून मतदान केले. अंतराळवीरांसाठी असलेल्या या सोयीमुळे ते त्यांचे नागरिक म्हणूनचे कर्तव्य निभावू शकतात. ते पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असले तरी देखील त्यांना मतदान करता येते. NASA च्या या सुविधेमुळे अमेरिकेच्या नागरिकत्वाचा अभिमान जागवण्याची संधी अंतराळवीरांना मिळते. त्यामुळे, कोठेही असले तरी अमेरिकन नागरिकांचा मतदानाचा हक्क वाचवण्याचा नासाचा प्रयत्न एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.
अमेरिकन नागरिकांसाठी मतदानाचे नियम
मतदानासाठी अमेरिकेतील प्रत्येक नागरिक वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्यात मतदानाचे स्वतंत्र ओळखपत्र नियम असतात; काही राज्यांमध्ये ड्रायव्हर परवाना, पासपोर्ट किंवा फोटो ओळखपत्र आवश्यक असू शकते. याशिवाय, अनेक राज्यांमध्ये मेल बॅलेट, किंवा मतदानाच्या आधीच वैयक्तिक मतदानाची परवानगी असते.अशा प्रकारे, अमेरिकन निवडणुकीची प्रक्रिया, निकाल आणि विविध पद्धतींनी मतदानाची सोय करून प्रत्येक अमेरिकन नागरिकाला सहभागी होण्याचा अधिकार दिला जातो, मग तो देशात असो वा अंतराळात.