Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांचे यशस्वी पुनरागमन; विजयानंतर ‘मेक द अमेरिकन ग्रेट’चा समर्थकांसमोर नारा

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या असून डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा बहुमताने यशस्वी झाले आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा पुनरागमन झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2024 | 04:24 PM
डाोनाल्ड ट्रम्प यांचे यशस्वी पुनरागमन; विजयानंतर 'मेक द अमेरिकन ग्रेट'चा समर्थकांसमोर नारा

डाोनाल्ड ट्रम्प यांचे यशस्वी पुनरागमन; विजयानंतर 'मेक द अमेरिकन ग्रेट'चा समर्थकांसमोर नारा

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या असून डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा बहुमताने यशस्वी झाले आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा पुनरागमन झाले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर आपले पहिले भाषण दिले या भाषणात त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. ट्रम्प यांनी समर्थकांचे आभार मानले. तसेच त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वातोपरी प्रयत्न करू असे म्हटले.

‘माझे सर्वस्व अमेरिकेला समर्पित’

या दरम्यान त्यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या आपल्या प्रसिद्ध घोषणेचा पुनरुच्चार करत ट्रम्प यांनी केला. त्यांनी म्हटले की, “माझे प्रत्येक श्वास अमेरिकेसाठी आहे. मी माझा संपूर्ण वेळ अमेरिकेला समर्पित करण्याचा प्रयत्न करेल.” तसेच त्यांनी अमेरिकन नागरिकांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी सतत लढण्याचे आश्वासनही त्यांनी अमेरिकन जनतेला दिले. “जोपर्यंत आम्ही आपल्या मुलांसाठी सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका निर्माण करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

हे देखील वाचा- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प; डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव

एलॉन मस्क यांचे मानले आभार

डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी सीमांचे संरक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, आणि राष्ट्रीय हिताची भावना पुन्हा जागृत करण्याचा संकल्प व्यक्त केला. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी उद्योगपती एलोन मस्क यांचे आभार मानले. निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि आर्थिक मदतीबद्दल त्यांनी मस्क यांचे कौतुक केले. मस्क यांनीही ट्रम्प यांना उत्साहाने पाठिंबा दिला होता.

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले – 

डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विजयाबद्दल त्यांना जगभरातून शुभेच्छा मिळत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या विजयाला ‘इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन’ म्हणत इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना नव्या उंचीवर नेण्याची आशा व्यक्त केली आहे. नेतन्याहू यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रिय डोनाल्ड आणि मेलानिया, ऐतिहासिक पुनरागमनाबद्दल अभिनंदन! व्हाईट हाऊसमध्ये तुमचे परतणे अमेरिकेसाठी नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. इस्रायल-अमेरिका संबंधांत ही एक नवीन बांधिलकी असेल.”

Dear Donald and Melania Trump,

Congratulations on history’s greatest comeback!

Your historic return to the White House offers a new beginning for America and a powerful recommitment to the great alliance between Israel and America.

This is a huge victory!

In true friendship,… pic.twitter.com/B54NSo2BMA

— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) November 6, 2024


स्रायल-अमेरिका संबंधांत अधिक दृढता वाढेल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही त्यांनी इस्रायलचे उघड समर्थन केले होते. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय ट्रम्प यांच्या नेतृत्वात घेतला गेला होता. हा निर्णय इस्रायलसाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरला. नेतन्याहूंच्या मते, या विजयाने इस्रायल-अमेरिका संबंधांत अधिक दृढता येईल. या निवडणुकीने अमेरिकन राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा- कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? कोणाचा विजय भारत संबंधासाठी अधिक चांगला; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केली भूमिका

Web Title: Us election result donald trumps victory speech nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Kamla harris
  • Us Election

संबंधित बातम्या

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
1

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.