US has invited Asim Munir to attend the Army Day celebration
वॉशिंग्टन: एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेने पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना अमेरिकेच्या आर्मी डे सेलिब्रेशनचे आमंत्रण दिले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. १४ जून रोजी अमेरिकेचे आर्मी डे सिलिब्रेशन होणार आहे. यासाठी १२ जून रोजी असीम मुनीर वॉशिंग्टन डीसीत पोहचणार असल्याचे म्हटले जात आहे. असीम मुनीर यांनी भारतविरोधी प्रचार केला होता. तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने त्यांना धडा शिकवला होता. पंरतु यानंतरही त्यांचा भारतविरोधी प्रचार सुरुच आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकेचे पाकिस्तानच्या धुर्त व्यक्तीला आमंत्रण देणे बारतासाठी धोक्याचे मानले जात आहे. सीएनएन टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाच्या हवाल्याने ही माहिती दिली. हवाल्याने सांगतिले की, असीम मुनीर यांना अमेरिकच्या २५०व्या सैन्य समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. या भेटीदरम्यान पाकिस्तानच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात ऑपरेशन सिंदरमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर दोन्ही देशांत चार दिवस लष्करी संघर्ष सुरु होता. दरम्यान १० मे रोजी पाकिस्तान आणि भारतात युद्धबंदी लागू करण्यात आली. या युद्धबंदीचे श्रेय ट्रम्प यांनी अनेक वेळा घेतले. तसेच पाकिस्ताननेही त्यांचे आभार मानले. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. परंतु भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी युद्धबंदीत कोणत्याही तिसऱ्या देशाच्या समावेश नव्हता हे स्पष्ट केले. यानंतरही ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीचे श्रेय घेतलेतच.
भारताने स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंसाठी दोन्ही देशांच्या डीजीएमोंनी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या अटींवर चर्चा करण्यात आली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली.
परंतु यानंतर ट्रम्प यांनी भारतवर नाराज होत विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ॲपलच्या सीईओंना भारतात आयफोनची फॅक्टरी न टाकण्याचा सल्ला दिला. तसेच सॅमसंगकंपनीलाही असाच इशारा त्यांनी दिला. दरम्यान असीम मुनीर यांना अमेरिकेचे आर्मी डे सेलिब्रेशनसाठी बोलवण्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंरतु ट्रम्प भारतविरोधी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट केली. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला होता. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा आणि त्यांच्या खोटारडेपणाचा जागतिक स्तरावर खुलासा केला आहे.