केनियात भीषण दुर्घटना; बस दरीत कोसळल्याने पाच भारतीयांचा मृत्यू, अनेकजण जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दोहा: केनियात एक दुर्दैवी घटना घडली. एक बस नियंत्रणाबाहेर गेल्याने दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि २७ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये कतारमधील २८ भारतीय नागरिक होते, यातील पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती दोहातील भारतीय दूतावासाने दिली. दूतावासाने एक्सवर एका पोस्टमध्ये सांगतिले की, ” कतारमधील २८ भारतीयांचा गट केनियाच्या दौऱ्यावर होता. यावेळी बसचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहे. दूतावासेन म्हटले की, नैरोबीतील भारतीय उच्चायुक्तालय घटनास्थळी पोहोचले असून जखमींना शक्य ती मदत पुरवत आहेत.
नैरोबातील भारतीय उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, केनियाच्या न्यानदारुआ काऊंटीमधील ओल जोरोरोक-नाकुरु रोडवर हा दु:खद अपघात घडली. भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेप्रती दु:ख व्यक्त केले. उच्चायुक्तालयाने सांगितले की, या अपघातात ५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने अपघातात मरण पावलेल्याप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबींयाप्रती संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.
उच्चायुक्तालयाने जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसेच जखमींना हवी ती मदत पुरवली जात असल्याचे म्हटले आहे. कॉन्सुलर पथक घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला असल्याचे उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.
A group of 28 Indians from Qatar were visiting Kenya, where their bus met with an unfortunate road accident yesterday. As per available information, 5 Indian nationals have lost their lives in the accident. Officials from HCI Nairobi are on the ground and extending all help (1/2)
— India in Qatar (@IndEmbDoha) June 10, 2025
द गल्फ टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय पर्यटक ज्या बसमध्ये प्रवास करत होते, ती बस ईशान्येकडे न्यादारुआ काऊंटी तील ओल जोरोरोक-नाकुरु रोजवरुन जात होती. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. यात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळक पटवण्याचे काम सुरु आहे. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.