
Indian Student Dies after suffering from burn in house fire
ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या; कुटुंबावर शोककळा, सरकारकडे केली मदतीची मागणी
मिळालेल्य माहितीनुसा सहजा रेड्डी उदुमाला (वय २४) ही न्यूयॉर्कमध्ये अल्बानी येथे राहत होती. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती येथे आली होती. मात्र काळाने तिच्यावर घात केला. एका घरात लागलेल्या भीषण आगीत सहजा ९०% भाजली गेली. तिला जखमी असवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अल्बानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. आगीने संपूर्ण घराला विळका घातला होता. काही विद्यार्थी आतमध्ये अडकले होते. अग्निशमन दलाने तातडीने आग विझवून विद्यार्थ्यांना बाहेर काही. त्यांना घटनास्थळी उपचार देण्यात आले. पंरुत सहजा गंभीर जखमी झाली होती. वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु सहजा ९०% भाजली गेल्याने तिची प्रकृती अधिक खालावत गेली. तिचे संपूर्ण अवयव निकाली झाले होते. ज्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. (स्थानिक वेळेनुसार) सकाळी ११ च्या सुमारास कामावरुन घरी परतली होती आणि न्यूयॉर्कमधील अल्बानी येथील तिच्या घरात तिच्या खोलीत झोपली होती. यावळे अचानक आग लागली. सहजा झोपली असल्याने तिला आग लागल्याचे लक्षात आले नाही आणि ती या घटनेत गंभीर जखमी झाली. सध्या या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. सहजा ही आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील रहिवासी आहे.
दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेवर शोक व्यक्त केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दूतावासाने म्हटले आहे की, अल्बानी येथे घराला लागलेल्या आगीत सहजा रेड्डी उदुमलाचा बळी गेला, तिच्या अकाली निधनाने खूप दु:ख झाले आहेत. या कठीण काळात आमच्या संवेदना तिच्या कुटुंबासोबत आहेत. तसेच आम्ही उदुमालाच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि शक्य ती मदत करु असेही दूतावासाने म्हटले आहे.
भारतीय विद्यार्थीनीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; समुद्रकिनारी आढळला मृतदेह
Ans: अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील अल्बानी येथे सहजा राहत असलेल्या घराला भीषण आग लागली. या आगीत सहजाचा ९०% भाजल्याने मृत्यू झाला आहे.
Ans: भारतीय विद्यार्थीनी सहजा रेड्डी उदुमालाच्या अकाली मृत्यूवर न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत त्यांना शक्य ती मदत करण्याचे म्हटले आहे.