Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Airstrike: ‘वेळ, पद्धत आणि ॲक्शन, सर्वकाही सैन्य ठरवेल’, इराणला राग अनावर, UNSC मध्ये दिली धमकी

Iran Israel War : इराणमधील अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या या कारवाईवर इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 23, 2025 | 11:57 AM
US-Iran Airstrike Iran warns in UNSC says military will decide time and response

US-Iran Airstrike Iran warns in UNSC says military will decide time and response

Follow Us
Close
Follow Us:

Iran Israel War : इराणमधील अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या या कारवाईवर इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तीव्र प्रतिक्रिया दिली असून, थेट धमकीच दिली आहे की “आता वेळ, पद्धत आणि कृती सर्वकाही लष्करच ठरवेल.” या घडामोडीमुळे अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आणखी पेट भरला असून, संभाव्य युद्धजन्य स्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचा अचानक हल्ला आणि इराणची संतप्त प्रतिक्रिया

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या अणुउद्योगावर थेट हल्ला चढवला. हा हल्ला अचानक करण्यात आला असून, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “इराणवर हल्ला करायचा की नाही याचा आम्ही विचार करीत आहोत” असे सूचित केले होते. मात्र, कोणतीही अधिकृत पूर्वसूचना न देता अमेरिका सरळ हल्ला करण्याच्या निर्णयावर पोहोचली, ज्यामुळे इराण आक्रमक झाला आहे.

या पार्श्वभूमीवर इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत इराणने अमेरिकेच्या कृतीला “सरळ आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन” असे ठरवले आणि कडाडून टीका केली. इराणच्या शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता वेळ, पद्धत आणि कृती आम्ही ठरवणार आहोत. आमचे लष्कर योग्य वेळी उत्तर देईल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Middle East conflict : रशिया पण युद्धात उडी मारणार का? इराणचे परराष्ट्र मंत्री आज पुतिन यांना भेटणार

UN महासचिव गुटेरेस यांचा इशारा

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनीही या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “इराणच्या अणुउद्योगावर अमेरिकेने केलेला हल्ला मध्यपूर्वेत आधीच असलेल्या तणावात घातक वाढ करू शकतो. ही कृती विनाशकारी बदलाचे दलदल ठरू शकते.” गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन केले असून, या कारवाईमुळे पश्चिम आशियातील शांती प्रक्रियेला जबरदस्त धक्का बसल्याचे म्हटले आहे.

युद्धजन्य स्थिती आणि जागतिक प्रतिक्रिया

इराणने अमेरिकेला खुली धमकी दिल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. काही देशांनी अमेरिकेच्या कृतीचे समर्थन केले असले, तरी बहुतांश राष्ट्रांनी संयम आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. युरोपीय संघ, चीन आणि रशिया यांनीही दोन्ही देशांनी थेट टक्कर टाळावी असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या सीमांवर अलर्ट वाढवला आहे, तर इराणनेही आपल्या संरक्षण व्यवस्थेत हालचाली सुरू केल्या आहेत. काही अहवालांनुसार, इराणमधील मोठ्या शहरांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran nuclear sites strike : ‘इराण एक मोठी अणुशक्ती अन् खामेनींची राजवट…’ इस्रायलने स्पष्टच सांगितला युद्धाचा उद्देश

 आणखी एका युद्धाची चाहूल?

अमेरिकेचा हल्ला, इराणची संतप्त प्रतिक्रिया आणि संयुक्त राष्ट्रांत दिलेली थेट धमकी. या साऱ्या घडामोडी जगाला नव्या संकटाच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहेत. अमेरिका-इराण संघर्ष आता केवळ राजनैतिक नाही, तर थेट लष्करी टप्प्यावर पोहोचला आहे. जर ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, असा इशारा जागतिक विश्लेषक देत आहेत. आता संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिका आणि इराणच्या पुढील पावलांकडे लागले आहे.

Web Title: Us iran airstrike iran warns in unsc says military will decide time and response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
2

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
3

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
4

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.