Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : इराणचा प्रस्ताव थेट कचऱ्यात! ट्रम्प यांचे सूर पुन्हा बदलले; इराणसमोर आखली ‘रेड लाईन’, युद्ध अटळ?

US Iran Ceasefire Update : अमेरिका इराण युद्धबंदीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी इराणचा १० कलमी प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरुच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 09:09 AM
Trump Rejects Iran's 10 Point Proposal

Trump Rejects Iran's 10 Point Proposal

Follow Us
Follow Us:
  • इराणचा १० कलमी प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला
  • युद्धविराम संपुष्टात येणार?
  • लेबनॉनवरील हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकणार?
Trump Rejects Iran’s 10 Point Proposal : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धविरामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने सादर केलेला १० कलमी प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फेटाळून लावला आहे. व्हाईट हाऊसने इराणच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवरही हल्ले सुरुच आहे. यामुळे तणाव वाढला असून इराणने हल्ले थांबले नाही तर युद्धविराम कारारतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. यामुळे पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

Israel Iran War : लेबनॉनवरील हल्ले थांबवा, अन्यथा…; इराणचा इस्रायलला उघड इशारा, युद्धबंदीच्या प्रयत्नांवर फिरणार पाणी?

अमेरिकेची आक्रमक भूमिका

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, इराणचा १० कलमी प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला असून तो कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला आहे. हा प्रस्ताव एकतर्फी आणि गंभीर्यपूर्ण नव्हता आणि ट्रम्प यांना तो वाटाघाटीसाठी पात्र वाटला नाही. यामुळे आता प्रस्तावाची एक नवी सुधारित योजना सादर करण्यात आली आहे. तसेच ट्रम्प यांच्या १५ कलमी प्रस्तावाशी जोडून आता वाटाघाटींची चर्चा होणार असल्याचे सेक्रटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी इराणसमोर रेड लाइन आखली आहे. इराणने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावे अशी अट ट्रम्प यांनी घातली आहे.

#WATCH | White House Press Secretary Karoline Leavitt says, “…Iran has agreed to open the Strait of Hormuz, and as the president said, we have received a proposal from the Iranians that has been determined to be a workable basis on which to negotiate…The Iranians originally… pic.twitter.com/kBLBqd5Hb4 — ANI (@ANI) April 8, 2026

लेबनॉनवर हल्ले सुरुच

दुसरीकडे इस्रायलकडून युद्धबंदीच्या घोषणेनंतरही लेबनॉनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे इराणने संताप व्यक्त केला असून हल्ले थांबले नाहीत, युद्धविराम करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव (US Iran War) पुन्हा एकदा भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्लामाबाद मध्ये १० एप्रिल रोजी होणाऱ्या चर्चेपूर्वीच ट्रम्प यांनी आपले सूर बदलल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

#WATCH | White House Press Secretary Karoline Leavitt says, “President Trump and the team determined the new modified plan was a workable basis on which to negotiate and to align it with our own 15-point proposal. The President’s red lines, namely the end of Iranian enrichment in… pic.twitter.com/egMK5CJsbV — ANI (@ANI) April 8, 2026

US Iran Ceasefire : होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत… इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प? शांतता टिकणार का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराणमधील युद्धविराम धोक्यात का आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणचा १० कलमी प्रस्ताव फेटाळला असून रेड लाईन आखली आहे. तसेच इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले थांबण्याचे नाव घेईना. यामुळे इराण संतप्तहोऊन युद्धविराम करारातून माघार घेऊ शकतो.

  • Que: ट्रम्प यांनी इराणचा १० कलमी प्रस्ताव का नाकारला?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, इराणचा १० कलमी प्रसाव अयोग्य आहे. इराणने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावे अशी त्यांनी अट घातली आहे. यामुळे हा प्रस्ताव नाकरला असल्याचे व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी लेविट यांनी म्हटले आहे.

Web Title: Us iran ceasefire donald trump rejects irans 10 point proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
1

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र
2

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
3

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Deutsche Bahn : जर्मनीमधील रेल्वे सेवा झाली पूर्णपणे ठप्प! मध्यरात्रीच्या गोंधळामुळे झाली वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी पडले अडकून
4

Deutsche Bahn : जर्मनीमधील रेल्वे सेवा झाली पूर्णपणे ठप्प! मध्यरात्रीच्या गोंधळामुळे झाली वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी पडले अडकून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.