Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : अमेरिकेने पुन्हा फेटाळला इराणचा प्रस्ताव; ‘या’ मुद्द्यावरुन चढला ट्रम्प यांचा पारा, महायुद्धाची ठिणगी उडणार?

US Iran Conflict Update : ट्रम्प यांनी पुन्हा इराणच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी इराण अमेरिकेसोबत गेम खेळत असल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 12:12 PM
Donald Trump Again rejects iran's proposal

Donald Trump Again rejects iran's proposal

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वे पुन्हा भडकणार?
  • ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा प्रस्ताव
  • या मुद्द्यांवरुन संघर्षाची ठिणगी
US Iran Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणला पाठवलेला प्रस्तावावर इराणने प्रति-प्रस्ताव पाठवला होता. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत हा इराणचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इराण अमेरिकेसोबत खेळ खेळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण हा गेम जास्त काळ टिकणार नाही असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार?

नेमका कुठे अडला खेळ?

गेल्या आठवड्याच्या सुरुवातील अमेरिकेने इराणला पीस प्रपोजल पाठवला होता. यामध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्याची आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा सुरु करण्याची अट घालण्यात आली होती. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव इराणला पाठवण्यात आला होता.

दरम्यान रविवारी(१० मे) इराणने अमेरिकेच्या प्रस्तावर प्रत्युत्तर पाठवले आहे. या उत्तरात इराणने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचे आणि होर्मुझमध्ये इराणी जहाजांची नाकेबंदी हटवण्याची मागणी केली आहे. मात्र ट्रम्प यांना या अटी असामाधानकारक वाटल्याने त्यांना हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

४७ वर्षांचा हिशोब करणार ट्रम्प

ट्रम्प यांनी प्रस्ताव नाकारताना इतिहासाचा उल्लेख केला. त्यांनी ट्रुथवरील पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या ४७ वर्षांपासून इराण अमेरिकेशी गेम खेळत आहे. आमच्या निरापराध नागरिकांचे बळी घेत आहे, आमच्यावर जगासमोर हसत आहे. अमेरिकेला ताटकळत ठेवून केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. हे आम्हाला मान्य नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अण्वस्त्र कार्यक्रमावरुन इशारा

ट्रम्प यांनी इराणचा केवळ प्रस्ताव फेटाळलेला नाही. तर इराणला गंभीर इशाराही दिला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने इराणमध्ये आपले ७०% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता उर्वरित टार्गेटवर कारवाईची वेळ आली आहे. इराणचे अणु तळ सध्या अमेरिकेच्या रडारवर असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

त्यांनी म्हटले की, इराणचे उर्वरित युरेनियम साठ्यांची ठिकाणे आम्हाला माहित आहे. जर कोणी त्या ठिकाणांच्या जवळ गेला तर त्याची आम्हाला लगेच माहिती मिळेल आणि त्याला क्षणात ठार केले जाईल असा कडक इशारा ट्रम्प यांनी दिला.

Alien Mystery : ट्रम्प यांचा धमाका! UFO संबंधित गोपनीय फाइल्स सार्वजनिक, Aliens चे गूढ उलगडणार? वाचा सविस्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव का नाकरला ?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, इराण गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकेची दिशाभूल करत आहे. इराणने पाठवलेला प्रस्ताव केवळे एक गेम असून अमेरिकेच्या अटी मान्य न करता, केवळ दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे इराणचा प्रस्ताव पूर्णपणे नामंजूर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • Que: इराणच्या नव्या प्रस्तावा कोणत्या अटी होत्या?

    Ans: इराणने पाकिस्तानमार्फत पाठवलेल्या नव्या प्रस्तावात युद्ध संपवण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची आणि होर्मुझमधील नाकेबंदी हटवण्याची अट होती.

  • Que: अण्वस्त्र कार्यक्रमावरुन ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला?

    Ans: इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करावा, अन्यथा त्यांच्या उर्वरित युरेनियम साठ्यावर हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

Web Title: Us iran conflict donald trump again rejects irans proposal deadlock over strait of hormuz and nuclear sites

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.