Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Ports: अरबी समुद्रात USचे 5,000 सैनिक रणांगणात; इराणच्या बंदरांना लष्करी वेढा; ट्रम्प यांचा ‘नो कॉम्प्रोमाईज’ फॉर्म्युला

Iran Ports Restricted: आज, अमेरिकेने इराणवर कडक सागरी नाकेबंदी लादली आणि शस्त्रसंधी वाढवण्यास नकार दिला. ४८ तासांच्या आत नऊ जहाजे परत पाठवण्यात आली. ५,००० अमेरिकन सैनिक ही महत्त्वपूर्ण मोहीम पार पाडत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 16, 2026 | 08:35 AM
us iran naval blockade uss abraham lincoln strait of hormuz restrictions 2026

us iran naval blockade uss abraham lincoln strait of hormuz restrictions 2026

Follow Us
Follow Us:
  • कडक सागरी नाकेबंदी
  • शस्त्रसंधीला नकार
  • इराणची कोंडी

USS Abraham Lincoln Arabian Sea mission : जागतिक राजकारणात आज एका अत्यंत संतापजनक आणि युद्धाच्या छायेने भरलेल्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अमेरिकेने इराणविरुद्धच्या (US-Israel Iran War) आपल्या लष्करी मोहिमेला धार चढवत चक्क ‘सागरी नाकेबंदी’ (Naval Blockade) जाहीर केली आहे. अरबी आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेची नौदल शक्ती आता पूर्ण ताकदीनिशी तैनात झाली असून, इराणच्या बंदरांकडे जाणारा प्रत्येक रस्ता आता अमेरिकेच्या तोफांच्या निगराणीखाली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवण्यास स्पष्ट नकार देऊन थेट संघर्षाचे संकेत दिले आहेत.

४८ तासांत इराणला धक्का: नऊ जहाजे रोखली

अमेरिकेच्या या कडक नाकेबंदीचा परिणाम अवघ्या ४८ तासांत दिसून आला आहे. यूएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन नौदलाच्या कडक सुरक्षेला भेदून इराणच्या बंदरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ व्यापारी जहाजांना अमेरिकन युद्धनौकांनी रोखले. ही जहाजे इराणच्या दिशेने जात होती, परंतु अमेरिकन सैन्याच्या कडक इशाऱ्यांनंतर त्यांना आपला मार्ग बदलून माघारी फिरावे लागले. ही एक प्रकारे इराणच्या अर्थव्यवस्थेची नाकेबंदी असून, यामुळे इराणचा समुद्री व्यापार पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chinese Spy Satellite: इराणला ड्रॅगनने दिले ‘हेरगिरीचे डोळे’; अंतराळातून रचला अमेरिकेच्या विनाशाचा कट, वाचा कसे ते?

अब्राहाम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप: ५,००० सैनिकांचा वेढा

या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेची महाकाय युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ (USS Abraham Lincoln) करत आहे. या युद्धनौकेसोबत ५,००० खलाशी आणि मरीन सैनिक सज्ज आहेत. सेंट्रल कमांडने जारी केलेल्या अधिकृत व्हिडिओमध्ये अमेरिकन फायटर जेट्स आणि सैनिकांची आक्रमक हालचाल दिसून येत आहे. ही केवळ गस्त नसून, इराणला लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या बिगर-इराणी जहाजांना सुरक्षा देणे आणि इराणी जहाजांना रोखणे हे या सैनिकांचे मुख्य कर्तव्य बनले आहे.

CENTCOM: “Yesterday, an Iranian-flagged cargo vessel tried to evade the U.S. blockade after leaving Bandar Abbas, exiting the Strait of Hormuz, and transiting along the Iranian coastline. The guided-missile destroyer USS Spruance (DDG 111) successfully redirected the vessel,… pic.twitter.com/zhEolRCqlM — Breaking911 (@Breaking911) April 16, 2026

credit – social media and Twitter

व्हाईट हाऊसचा पवित्रा: “शस्त्रसंधी नाही, फक्त अटी!”

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका कोणतीही शस्त्रसंधी वाढवणार नाही. “आम्ही कोणाकडेही शस्त्रसंधीची विनंती केलेली नाही. आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अटींचे पालन करणे हेच इराणच्या हिताचे आहे,” असे लेविट यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे आता मुत्सद्देगिरीचे दरवाजे जवळजवळ बंद झाले असून, केवळ लष्करी दबाव वाढवला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan HIV : माणुसकीला काळिमा! पाकिस्तानमध्ये एकाच सुईने 331 चिमुरड्यांना दिला मृत्यूचा डोस; सरकारी रुग्णालयाचा भयंकर प्रताप

जागतिक परिणाम आणि इराणची हतबलता

इराण सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. एका बाजूला आर्थिक निर्बंध आणि दुसऱ्या बाजूला ही सागरी नाकेबंदी. अमेरिकेने इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व परदेशी जहाजांनाही हा नियम लागू केला आहे, ज्यामुळे कोणताही देश आता इराणशी व्यापार करण्याचे धाडस करताना दिसत नाही. सेंटकॉम (CENTCOM) या भागात आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करत असल्याचे सांगत असले तरी, ही प्रत्यक्षात इराणला गुडघ्यावर आणण्याची योजना आहे. आता इराण या नाकेबंदीला प्रत्युत्तर देतो की ट्रम्प यांच्या मागण्या मान्य करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी का लादली आहे?

    Ans: इराणला वाटाघाटीसाठी मजबूर करणे आणि त्यांच्या अण्वस्त्र व लष्करी कारवायांवर लगाम घालण्यासाठी अमेरिकेने ही कडक सागरी नाकेबंदी लादली आहे.

  • Que: 'यूएसएस अब्राहम लिंकन'चे या मोहिमेत काय महत्त्व आहे?

    Ans: ही अमेरिकेची प्रमुख विमानवाहू युद्धनौका असून ५,००० सैनिकांसह ती इराणच्या सागरी सीमांवर नियंत्रण ठेवत आहे.

  • Que: नाकेबंदीमुळे किती जहाजांना मागे फिरावे लागले?

    Ans: नाकेबंदी लागू झाल्याच्या पहिल्या ४८ तासांत अमेरिकन नौदलाने एकूण नऊ जहाजांना इराणकडे जाण्यापासून रोखले आणि त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले.

Web Title: Us iran naval blockade uss abraham lincoln strait of hormuz restrictions 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
1

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत
2

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद
3

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार
4

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.