Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर

US Iran Deal: तेलाच्या वाढत्या किमतींशी झगडणाऱ्या जगासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिका, इराण आणि ओमान यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याबाबत एक करार केला असून, याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 05, 2026 | 02:24 PM
us iran oman strait of hormuz deal agreements oil prices marathi news

us iran oman strait of hormuz deal agreements oil prices marathi news

Follow Us
Follow Us:
  • ६० दिवसांचा ऐतिहासिक अंतरिम करार
  • जहाजांसाठी नवीन सागरी मार्ग आणि शुल्कमुक्ती
  • ३० दिवसांत सुरुंग निर्मूलन व अण्वस्त्र चर्चांचा मार्ग मोकळा

गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत्या इंधन दरवाढीशी आणि जागतिक महागाईशी झुंजणाऱ्या संपूर्ण जगासाठी आज एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तीव्र लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, इराण आणि ओमान हे तिन्ही देश अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘होर्मुझचा सागरी मार्ग’ (Strait of Hormuz)आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पुन्हा खुला करण्याच्या करारावर पोहोचले आहेत. अमेरिकन वृत्त संकेतस्थळ ‘ॲक्सिऑस’ने (Axios) दिलेल्या माहितीनुसार, या कराराची अधिकृत घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही काळापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची आणि नैसर्गिक वायूची वाहतूक ठप्प झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या होत्या. इंधन पुरवठ्याची साखळी कोलमडल्याने अमेरिका, आशिया आणि युरोपसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा ताण आला होता. अशा कठीण परिस्थितीत अमेरिका आणि इराण यांनी ओमानच्या मध्यस्थीने टेबल टॉक्सचा (Negotiations) मार्ग स्वीकारून या ६० दिवसांच्या अंतरिम व्यवस्थेला मान्यता दिली आहे. हा करार केवळ तेलपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचा नसून, दोन्ही देशांमधील संभाव्य युद्धाचा धोका टाळण्यासाठी आणि भविष्यातील अण्वस्त्र चर्चांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Blogger Day: 5 ऑगस्टला का साजरा केला जातो ‘ब्लॉगर डे’? जाणून घ्या डिजिटल युगातील ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

काय आहेत या ऐतिहासिक करारातील मुख्य अटी?

या अंतरिम करारानुसार पुढील ६० दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. या ६० दिवसांच्या कालावधीत सर्व बाजूंच्या सहमतीने पुढील कायमस्वरूपी व्यवस्थेवर चर्चा केली जाईल. करारातील प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत:

  • जहाजांसाठी स्वतंत्र सागरी मार्ग: आंतरराष्ट्रीय जहाजांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी वाहतुकीचे विभाजन करण्यात आले आहे. आखाती देशांकडे (Persian Gulf) जाणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांना इराणच्या सागरी हद्दीतून जाणाऱ्या ‘उत्तर मार्गाचा’ (Northern Lane) वापर करावा लागेल. तर अरबी समुद्राच्या (Arabian Sea) दिशेने जाणाऱ्या जहाजांना ओमानच्या सागरी हद्दीतील ‘दक्षिण मार्गावरून’ प्रवास करावा लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया इराणसोबत योग्य तो समन्वय साधून पार पाडली जाईल.
  • प्रवासासाठी कोणतेही टोल किंवा अतिरिक्त शुल्क नाही: या सुरुवातीच्या ६० दिवसांच्या कालावधीत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापारी किंवा तेलवाहू जहाजाकडून कोणताही टोल, कर अथवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
  • ३० दिवसांत सागरी सुरुंग निर्मूलन अभियान: युद्धाच्या काळात होर्मुझच्या ‘मध्यवर्ती मार्गात’ (Middle Lane) टाकलेले धोकादायक नौदल सुरुंग (Naval Mines) हटवण्याचे काम पुढील ३० दिवसांत पूर्ण केले जाईल. दोन्ही देशांची पथके या मोहिमेत तांत्रिक सहकार्य करतील.
  • कायमस्वरूपी तोडग्यासाठी नवीन चौकट: मध्यवर्ती मार्ग एकदा पूर्णपणे सुरुंगमुक्त झाल्यानंतर, ओमान आणि इराण यांच्यात आपापसात ठरवल्या जाणाऱ्या कायमस्वरूपी व्यवस्थेअंतर्गत जहाजांची ये-जा सुरू राहील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza: ‘तोपर्यंत सैन्य गाझामधून माघार घेणार नाही’, डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या शांतता योजनेला इस्रायलचा स्पष्ट नकार; नेतान्याहू ठाम

इराणला काय मिळणार आणि जगावर काय परिणाम होणार?

या करारामुळे इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी रहदारीवर आणि सुरक्षेवर पूर्वीपेक्षा अधिक नियंत्रण मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. होर्मुझच्या मार्गावर आपले वर्चस्व आणि नियंत्रण असावे, ही इराणची दीर्घकाळापासूनची मुख्य मागणी राहिली आहे. त्यामुळे या कराराकडे इराणच्या दृष्टीने एका राजकीय मुत्सद्देगिरीचा विजय म्हणून पाहिले जात आहे.

दुसऱ्या बाजूला, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अत्यंत टोकाची लष्करी कारवाई किंवा बॉम्बफेक टाळून राजनैतिक मार्गाने व्यापार मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर या पावलाचे स्वागत केले जात आहे. या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारात आणि तेल बाजारात सकारात्मक संदेश गेला असून, येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती घसरून इंधनाचे दर कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात निर्माण झालेला युद्धसदृश तणाव निवळण्याच्या दृष्टीने हा करार एक महत्त्वपूर्ण ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकतो.

Web Title: Us iran oman strait of hormuz deal agreements oil prices marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
1

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.