Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : ‘या’ एका अटींमुळे फिस्कटली शांतता चर्चा; इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप, म्हणाला…

US Iran Tensions : इस्लामाबाद येथील शांतता चर्चा फिस्कटल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचून पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 01:06 PM
US Iran Peace Talks

US Iran Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण चर्चा निष्फळ
  • जे युद्धात शक्य झालं नाही, तर चर्चेतून साध्य करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
  • इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप
US Iran Peace Talks Fails : वॉशिंग्टन/तेहरान : शनिवारी (११ एप्रिल २०२६) पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा पार पाडली. जवळपास २१ तास ही चर्चा सुरु होती. मात्र या चर्चेत कोणताही निकाल लागलेला नाही. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. इराणने अमेरिकेवर गंभीर आरोपही केले आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गढद झाले आहेत.

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं

नेमकं काय घडलं चर्चेत?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या मध्यस्थीने अमेरिका इराणमध्ये वाटाघाटी चर्चा सुरु होती. मात्र इस्लामाबादमध्ये सुरु असलेल्या उच्चस्तरीय राजनैतिक चर्चेत कोणताही ठोस करार झालेला नाही. इराणच्या मते, अमेरिकेच्या अटी अत्यंत जाचक आणि कठोर होत्या. यामुळेच चर्चा फिस्कटली असल्याचे इराणने म्हटले असून अमेरिकेच्या तटस्थ भूमिकेवर टीका केली आहे.

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेला युद्धात जे साध्य करता आले नाही, ते चर्चेच्या टेबलावर साध्य करायचे होते. चर्चेच्या माध्यमातून इराणचे होर्मुझवरील नियंत्रण कमी करण्याचा आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर बंदी घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरु होता. काही मुद्द्यांवर दोन्ही देशांतमध्ये सहमती झाली, परंतु महत्त्वाच्या  विषयांवर वाद कायम राहिल्याने चर्चा थांबवावी लागली. इराणने राष्ट्रीय हिताशी तडजोड करण्यास नकार दिला.

अमेरिकेचे स्पष्टीकरण

दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी रविवारी(१२ एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही २१ तास सलग चर्चा केली. परंतु इराणने आमच्या अटी मान्य करण्यास नकार दिला असून ही अत्यंत वाईट बाब आहे. वेंस यांच्या म्हणण्यानुसार, इराणने अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याबाबत कोणतीही ठोस हमी दिली नाही, हा अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

दरम्यान या चर्चेवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, पाकिस्तानने दोन्ही देशांना चर्चेच्या एका टेबालावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु करार होऊ शकला नाही. असे असले तर आमची इच्छा आहे की, दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी आणखी वाढवण्यात यावी. पुढील चर्चेसाठी वातावरण शांत राहणे, दोन्ही देशांनी संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे इशाक दार यांनी म्हटले. आता पाकिस्तानच्या या विनंतीला मान देऊन अमेरिका इराणमधील शस्त्रसंधी वाढते का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

JUST IN 🇵🇰🇮🇷: Pakistan Issues Statement on Failed U.S. and Iran Talks in Islamabad “Pakistan will continue facilitating engagement and dialogue between Iran and the United States in the days to come.” https://t.co/TSeq24J1eJ pic.twitter.com/eYPoGkEejj — Ryan Rozbiani (@RyanRozbiani) April 12, 2026


Trump Warns China : इराणला मदत करणं चीनला पडणार महागात; ट्रम्प यांनी दिला ड्रॅगनला थेट इशारा

Web Title: Us iran peace talks fail nuclear condition iran blames us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार
1

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान
2

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?
3

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल
4

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.