Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: इराणचा आखाती देशांमध्ये कहर! कुवेत, बहरीन आणि जॉर्डनवर ड्रोनचा पाऊस; लष्कराकडून हाय अलर्ट जारी

US-Iran Conflict: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देश हादरले असून, कुवेत आणि बहरीनमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर लष्कराने सुरक्षाविषयक सूचना जारी केल्या आहेत. आयआरजीसीने या हल्ल्यांची पुष्टी केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 13, 2026 | 06:47 PM
मध्य-पूर्वेत पुन्हा उडणार भीषण युद्धाचा भडका

मध्य-पूर्वेत पुन्हा उडणार भीषण युद्धाचा भडका

Follow Us
Follow Us:
  • इराणचे आखाती देशांवर हल्ले
  • लष्करी तळांचे मोठे नुकसान
  • आखाती देशांमध्ये हाय अलर्ट

अमेरिका आणि इराणमधील थेट संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले सुरू केले आहेत. कुवेत, बहरीन आणि जॉर्डन या देशांवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन डागण्यात आल्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात (Gulf Region) युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रचंड घबराट पसरली आहे.

इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आखाती देशांचे लष्कर सतर्क झाले असून, बहरीन आणि कुवेतने आपापल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने आपत्कालीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कुवेत आणि बहरीनमध्ये सायरनचे आवाज; नागरिक सुरक्षित स्थळी

सोमवारी पहाटेपासूनच कुवेतच्या हवाई हद्दीत इराणकडून सातत्याने हल्ले होत असल्याचे कुवेती लष्कराने जाहीर केले आहे. कुवेती लष्कराच्या जनरल स्टाफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “आमचे सुरक्षा दल सध्या कुवेती हवाई क्षेत्रात घुसलेल्या शत्रूच्या हवाई लक्ष्यांवर (ड्रोन आणि क्षेपणास्त्रे) यशस्वी कारवाई करत आहेत. शहरांमध्ये ऐकू येणारे स्फोटांचे आवाज हे आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने (Air Defence System) शत्रूचे हल्ले हवेतच निकामी केल्यामुळे होत आहेत.” लष्कराने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Egypt Tombs: सोन्याच्या जिभा, दुसऱ्या जगाचा दरवाजा, देवांशी संबंध; इजिप्तमध्ये सापडल्या 2000 वर्षे जुन्या प्राचीन रहस्यमयी 18 कबरी

दुसरीकडे, बहरीनची राजधानी आणि प्रमुख शहरांमध्ये युद्धाचे सायरन वाजवण्यात आले आहेत. बहरीनच्या गृह मंत्रालयाने एक अत्यंत संवेदनशील जाहीर सूचना जारी केली असून, सर्व नागरिकांना आणि परदेशी रहिवाशांना आपापली घरे सोडून किंवा जिथे असतील तिथून तातडीने जवळच्या भूमिगत आणि सुरक्षित ठिकाणी (Shelters) आश्रय घेण्याचे आदेश दिले आहेत.

जॉर्डनकडून इराणचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त

या संपूर्ण संघर्षात केवळ कुवेत आणि बहरीनच नव्हे, तर जॉर्डनलाही इराणच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. जॉर्डनच्या हवाई दलाने आपल्या हद्दीत घुसलेले इराणचे अनेक आत्मघाती ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच पाडल्याचा दावा केला आहे. इराणने जॉर्डनमधील ‘प्रिन्स हसन हवाई तळाला’ (Prince Hassan Air Base) लक्ष्य करून हा हल्ला चढवला होता. पहिल्या टप्प्यात झालेल्या या हल्ल्यात तळावरील क्षेपणास्त्र साठे आणि इंधन टाक्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

Israeli media reports state Kuwait and Bahrain have launched unprecedented airstrikes against Iran, marking a massive escalation in the region. Should the Middle East unite to dismantle the Iranian regime? A. Yes
B. No pic.twitter.com/zxxGItRw1v
— WWG1WGA🇺🇸❤️ (@WWG1WGA_1Q) July 12, 2026

credit – social media and Twitter

होर्मुझची सामुद्रधुनी आणि संघर्षाची ठिणगी

इराणच्या निम-सरकारी ‘फर्स न्यूज एजन्सी’ने आयआरजीसीच्या हवाल्याने या सर्व हल्ल्यांची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने इराणच्या मुख्य भूभागावर केलेल्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही संपूर्ण मोहीम आखली गेली आहे.

या संघर्षाची सुरुवात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) झाली. आयआरजीसीच्या नौदलाने होर्मुझमधून प्रवास करणारी दोन आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजे परवानगीशिवाय आणि ट्रॅकिंग सिस्टीम बंद करून चालल्याचा आरोप करत जप्त केली. या कारवाईनंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणच्या तटीय भागातील क्षेपणास्त्र आणि ड्रोन केंद्रांवर सुमारे १४० हून अधिक भीषण हवाई हल्ले केले. या अमेरिकन हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर एकापाठोपाठ एक ४ टप्प्यांत प्रत्युत्तराचे हल्ले सुरू केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Qatar ties : कतारचे ‘राष्ट्रपिता’ शेख हमद अल थानी यांचे निधन; भारताने का जाहीर केला राष्ट्रीय शोक? जाणून घ्या नियम

अमेरिकन तळांचे भीषण नुकसान झाल्याचा इराणचा दावा

आयआरजीसीने आपल्या निवेदनात दावा केला आहे की, त्यांनी बहरीनमधील अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘ईसा एअर बेस’वर (Isa Air Base) भीषण मारा केला. या दुसऱ्या टप्प्यातील हल्ल्यात अमेरिकेच्या हेलिकॉप्टर देखभाल आणि दुरुस्ती केंद्राला, पी-८ इलेक्ट्रॉनिक युद्ध विमानांच्या हँगरला आणि लष्करी ड्रोन कारवायांच्या कमांड-अँड-कंट्रोल सेंटरला थेट लक्ष्य करण्यात आले.

कुवेतमधील अमेरिकी तळांचे नुकसान: इराणच्या प्रत्युत्तराच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात कुवेतमधील ‘अली अल सालेम’ आणि ‘अहमद अल जाबेर’ या अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यामध्ये अमेरिकेची अत्यंत प्रगत समजली जाणारी ‘पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली’ आणि ‘एफपीएस सामरिक रडार प्रणाली’ पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा इराणने केला आहे. तसेच, अमेरिकेचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे लष्करी क्षेपणास्त्र तळ आणि दोन हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) उडवून दिल्याचे इराणने म्हटले आहे.

या वाढत्या युद्धामुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या (Crude Oil) किमती कडाडण्याची शक्यता निर्माण झाली असून, संयुक्त राष्ट्रांनी (UN) दोन्ही देशांना तात्काळ युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी आक्रमक विधाने सुरू असल्याने हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Us iran war gulf countries kuwait bahrain jordan drone missile attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.