
US Iran War
Dअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ल्याची धमकी दिली होती. सुरुवातील कतारमधून अमेरिकी सैन्याच्या तुकड्या हालवून इराणच्या जवळ तैनात करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता ही लष्करी हालचाल अधिक जलद झाली आहे. अमेरिकेच्या नैदैदलाच्या ताफ्यात मोठ्या हालचाली दिसून येत आहे. अमेरिकी सैन्य पूर्णपणे हल्ल्यासाठी सज्ज असून केवळ ट्रम्प यांच्या आदेशाचा वाट बघत आहे. याच वेळी इराणने देखील अधिक अर्लटमोडमध्ये आला आहे. तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये देखील सध्या इराणवरील हल्ल्याच्या पर्यायावंर चर्चा सुरु आहे. इराणवर आतापर्यंतचा सर्वात घातक प्रहार करण्याची शिफारस केली जात आहे. तर काही लोक ट्रम्प यांना संयम बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
इराणने सुरक्षा वाढवत हवाई क्षेत्र बंद केले आहे. तसेच अमेरिकेला धमकी दिली आहे की, त्यांच्या अणुतळांवर हल्ल्या झाल्यास अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील. शिवाय याच वेळी इराणे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या देश सोडण्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. अद्याप सरकाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. परंतु सोशल मीडियावल खामेनी कुटुंबासह दुबई किंवा रशियाला पळण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या इराणमधील आंदोलनही आटोक्यात आले नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र देशात मार्शल लॉ लागू केल्याने इंटरेनेट आणि संपर्काच्या सर्व सुविधा बंद आहेत, यामुळे परिस्थितीबाबत खरी माहिती मिळणे कठीण झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, परंतु हे सर्व व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचा दावा इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी केले आहेत. तसेच त्यांनी इराणमधील आंदोलनाला बाहेरुन निधी मिळत असल्याचा दावा केला आहे. इराण सरकार आंदोलनाला दहशतनाद मानत आहे. इराणने यासाठी अमेरिकेला कारणीभूत ठरवले आहे.
Ans: सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव हा शिगेला पोहोचला आहे. इराणच्या जवळ मध्यपूर्वेत अमेरिकी सैन्याच्या लष्करी हालचालीही दिसून आल्या आहेत. यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ans: संभाव्य अमेरिकी हल्ल्याच्या भितीने इराणने आपले एअरस्पेस बंद ठेवले आहे.
Ans: इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.