
फोटो सौजन्य AI
२९ जुलै २०२६ मध्ये नेतन्याहू आणि ट्रम्प यांची भेट झाली आहे . ते वाशिंग्टन मधील व्हाईट हाऊस इथे भेटले आहेत . अर्थात या भेटीला खूप सारे कंगोरे आहेत . अलीकडेच न्यू यॉर्कच्या महापौरांनी म्हणजेच भारतीय वंशाच्या जोहरान ममदानी यांनी नेतन्याहू न्यू यॉर्क मध्ये आल्यास आपण त्यांना अटक करू असे विधान केले होते . त्यावर ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना आश्वस्त केले कि नेतन्याहू यांनी अमेरिकेत यावं , त्यांना अटक केले जाणार नाही .
या भेटीत इस्रायल इराण युद्ध , गाझा युद्ध , आणि इस्राइल मधील निवडणुका हे विषय चर्चिले आहेत . असे मिळालेल्या माहिती वरून समजते .याशिवाय नेतन्याहू अमेरिकेचे दिवंगत रिपब्लिक पक्षाचे सीनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत . लिंडसे ग्रॅहम हे कट्टर इस्रायल चे समर्थक होते . अशी ही माहिती मिळत आहे .
काही केल्या इराण शरण येत नाही , म्हणून आता इराणच्या बॉर्डर ज्या सात देशांशी जोडल्या आहेत . त्यावर नाकेबंदी करून इराणला व्यापार करण्यास अडचणीत आणावे लागेल . अश्या चर्च्या ट्रम्प आणि नेतान्याहू भेटीमागे असल्याचेही बोलले जात आहे . जोपर्यंत इराण ची आर्थिक स्थिती पूर्णपणे मोडकळीस येत नाही तोपर्यंत इराण चर्चेसाठी तयार होणार नाही . तसेच जमिनीवरील नाकेबंदी केल्यास याचे परिणाम सरळ जनतेवर होतील . वस्तूंच्या प्रवासात अडचणी आल्या तर वस्तू महागात , आणि पूर्ण नाकेबंदी असल्यावर उपासमारीची ही वेळ येऊ शकते . असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे . असे घडल्यास इराणसाठी ही खूपच चिंतेची बाब आहे .
सध्या इराण इराक, तुर्की, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान यांच्याशी आपली बॉर्डर शेअर करतो .