US Iran War : 'मी बलिदान देण्यास सज्ज...' , ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी राष्ट्राध्यक्षांची ठाम भूमिका; जनताही आहुती देण्यास तयार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोमवारी (०६ एप्रिल २०२६) ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी (०७ एप्रिल २०२६) रात्री ८ वाजेपर्यंतचा ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्यास आणि वाटाघाटी करु शांतता करार करण्यास सांगितले. तडजोड मन केल्यास ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांना, पूल आणि रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांना नष्ट करण्याची धमकी दिली.
त्यांनी म्हटले की, इराणला दिलेली वेळ आता संपत चाली आहे. जर करार झाला नाही, तर एका रात्रीत संपूर्ण इराण उद्ध्वस्त होईल, नरकात ढकलला जाईल. ट्रम्प यांच्या या विधानाने जगभरात खळबळ उडाली होती.
दरम्यान ट्रम्प यांच्या हल्ल्यांना खांबण्यासाठी इराणने एक वेगळीच रणनीती अवलंबवली आहे. इराणने देखील तरुणांना, खेळाडू, आणि कलाकांरांना महत्त्वाच्या वीज केंद्राभोवती मानवी साखळीचे आवाहन केले आहे. याचा उद्देश अमेरिकेला हल्ल्यापासून रोखणे आहे. यावर इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी देखील मी स्वत: सुद्ध इराणसाठी बलिदान देण्यास सज्ज आहे आणि सदैव राहीन असे म्हटले आहे.
بیش از ۱۴ میلیون ایرانی غیور تا این لحظه اعلام آمادگی کردهاند جان خود را برای دفاع از ایران فدا کنند. من نیز جانفدای ایران بودهام، هستم و خواهم بود.#جان_فدا — Masoud Pezeshkian (@drpezeshkian) April 7, 2026
या दरम्यानच इस्रायलने इराणी नागरिकांना थेट इशारा दिला आहे. इस्रायलने इराणी नागरिकांना रेल्वेप्रवास टाळण्याचा आणि त्या मार्गावरुन दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. हा संदेश इराणच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ल्याचा संकेत मानला जात आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिटक झाली आहे. जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. ज्याचा केवळ मध्यपूर्वच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम होईल.
Ans: ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुझ मार्ग खुला करण्याची आणि वाटाघाटी करार करण्याची चेतावणी दिली आहे. तडजोड न झाल्या इराणच्या पूल, रेल्वे, वीज यांसारख्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.
Ans: ट्रम्प यांच्या धमकीवर पेझेश्कियान यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी इराणची जनता अमेरिकेच्या हल्ल्याला घाबरत नाही, देशासाठी स्वत:चे प्राण देण्यासाठी १.४ दशलक्ष नागरिक तयार आहेत असे म्हटले. तसेच पेझेश्किया यांनी देखील बलिदान देण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले.






