India-EU FTA : युरोप आणि भारताची 'महायुती'! ट्रम्प प्रशासन आक्रस्ताळ्या भूमिकेत; अमेरिकेने युरोपला ठरवले 'देशद्रोही ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India EU Free Trade Agreement 2026 news : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जगभरातील राजकारणात एक मोठी खळबळ माजली आहे. एकीकडे नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भारताचे सामर्थ्य जगाने पाहिले, तर दुसरीकडे पडद्यामागे भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात ‘शताब्दीतील सर्वात मोठा’ व्यापार करार अंतिम झाला आहे. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ (Mother of All Deals) असे संबोधले जात आहे. मात्र, या करारामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन कमालीचे संतापले असून, त्यांनी युरोपवर गंभीर आरोप केले आहेत.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी डॅव्होस (Davos) येथील जागतिक आर्थिक परिषदेत बोलताना युरोपवर आगपाखड केली. बेझंट म्हणाले की, “आम्ही युक्रेन युद्धासाठी रशियाचा निधी रोखण्यासाठी भारताकडून आयात होणाऱ्या तेलावर २५% टॅरिफ लादले, पण आमच्या तथाकथित युरोपीय मित्रांनी आम्हाला साथ दिली नाही. उलट, ते भारतासोबत मोठा व्यापार करार करत आहेत.” त्यांनी युरोपला ‘Virtue Signaling’ (केवळ देखावा करणारे) म्हणत, युरोप स्वतःविरुद्धच्या युद्धालाच वित्तपुरवठा करत असल्याचा घणाघाती आरोप केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Mingze : चीनची ‘राजकुमारी’ सांभाळणार सत्तासूत्रे? शी जिनपिंग यांच्या मुलीच्या राजकीय प्रवेशाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा
भारत आणि २७ देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियनमधील या मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटी २००७ मध्ये सुरू झाल्या होत्या. तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा करार आता प्रत्यक्षात येत आहे.
US Treasury Secretary Scott Bessent says EU has refused to put tariffs on India because they ‘want to sign big trade deal with India’. Calls actions of Europeans ‘act of stupidity’ for buying refined energy from India. pic.twitter.com/7XLz1q2BZn — Sidhant Sibal (@sidhant) January 24, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China OIC : मध्य पूर्वेचा नवा ‘डॉन’? अमेरिकेला रोखण्यासाठी 57 मुस्लिम देशांना सोबत घेऊन बीजिंगची मोठी खेळी; ‘जंगली कायदा’ हेच कारण
स्कॉट बेझंट यांनी युरोपच्या भूमिकेला ‘मूर्खपणाचा परमोच्च बिंदू’ म्हटले आहे. त्यांच्या मते, भारत रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करतो, ते शुद्ध करतो (Refined Oil) आणि नंतर तेच तेल युरोपियन देश चढ्या दराने खरेदी करतात. अमेरिकेचा दावा आहे की, भारतावर दबाव टाकण्यासाठी युरोपलाही टॅरिफ लावणे गरजेचे होते, पण युरोपला भारतासोबतचा हा महाकरार गमवायचा नव्हता. यामुळेच ट्रम्प प्रशासनाने युरोपला एक प्रकारे ‘धोकेबाज’ ठरवले आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा करार केवळ व्यापारी नाही तर तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांना दिलेले एक उत्तर आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% पर्यंत टॅरिफ लावण्याची धमकी दिली असताना, भारताने युरोपशी हातमिळवणी करून आपल्या बाजारपेठा सुरक्षित केल्या आहेत. यालाच ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’ (धोरणात्मक स्वायत्तता) म्हटले जात आहे. उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा यांची प्रजासत्ताक दिनाची उपस्थिती हे सिद्ध करते की, युरोप आता अमेरिकेच्या दबावाखाली न राहता भारताला आपला प्रमुख धोरणात्मक भागीदार मानत आहे.
Ans: भारत आणि २७ युरोपीय देशांमधील हा 'मुक्त व्यापार करार' (FTA) असून, यामुळे ९०% पेक्षा जास्त वस्तूंवरील आयात शुल्क रद्द होईल. हा जगातील सर्वात मोठ्या करारांपैकी एक आहे.
Ans: अमेरिकेच्या मते, युरोप भारताकडून रशियन कच्च्या तेलापासून बनलेली उत्पादने खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशियाला युद्धात मदत करत आहे आणि भारतावर दबाव टाकत नाहीये.
Ans: भारतीय कापड, दागिने आणि फार्मा क्षेत्रातील निर्यात वाढल्याने लाखो रोजगार निर्माण होतील, तसेच युरोपीय आयात स्वस्त झाल्याने काही हाय-एंड गाड्या आणि वाइनच्या किमती कमी होऊ शकतात.






