ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली
इराणच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात केशम बेट आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक तेल वाहतुकीचा मोठा हिस्सा जात असल्याने या परिसरातील कोणतीही लष्करी हालचाल आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची ठरते.
इराणच्या सरकारी माध्यमांनी केशम बेटावर अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर आली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला मर्यादित आणि बचावात्मक कारवाई असे संबोधले आहे. अमेरिकेने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेतील क्षेपणास्त्रांशी संबंधित लक्ष्यांवर कारवाई केल्याचेही समोर आले आहे.
एकीकडे ट्रम्प प्रशासन इराणसोबत संभाव्य करार आणि राजनैतिक चर्चेच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे संकेत देत आहे. दुसरीकडे, इराणच्या लष्करी क्षमतेवर मर्यादा आणण्यासाठी अमेरिकेकडून गुप्त आणि मर्यादित हल्ले करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. या कारवाया सार्वजनिकरीत्या जाहीर न करण्यामागे मोठ्या प्रमाणावर युद्ध पुन्हा सुरू करण्याचा संकेत टाळण्याचा उद्देश असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढल्यास तेल वाहतूक, व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होऊ शकतो. केशम बेटावरील हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर युद्ध पुन्हा सुरू झाले आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक चर्चांना कितपत यश मिळते, तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा परिस्थिती कशी बदलते, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार
Ans: अमेरिकेने सोमवारी, 2 नोव्हेंबर 2026 रोजी इराणच्या केशम बेटावर मर्यादित लष्करी हल्लाची माहिती समोर आली.
Ans: अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई बचावात्मक स्वरूपाची होती. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेतील क्षेपणास्त्रांशी संबंधित लक्ष्यांवर कारवाई करण्यात आली.
Ans: सध्या मोठ्या प्रमाणावर युद्ध पुन्हा सुरू झाल्याची अधिकृत घोषणा नाही. मात्र, अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थिती नाजूक बनली आहे.






