
H-1B Visa social media checking
अमेरिकेचा नवीन नियम १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार असून आता एच-१बी व्हिसा धारकांना आणि एच-४ व्हिसा धारकांना त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट पब्लिक करावे लागणार आहे. यामुळे भारतीयांमध्ये घबराट पसरली आहे. हा नियम नव्या अर्जदारांसाठी आणि नूतनीकरणा करणाऱ्या अर्जदारांसाठी लागू होणार आहे.
अमेरिकेत ७० टक्क्याहून अधिक भारतीय एच-१बी व्हिसावर काम करातात. या व्हिसावर लोक अमेरिकेत नोकऱ्या करतात. त्यांची अमेरिकेत घरे आहे. तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील अमेरिकेत सुरु आहे. परंतु या नव्या नियमांमुळे या सगळ्यांमध्ये आता अडचणी निर्माण होणार आहेत.
या नव्या नियमांनुसार, एच-१बी व्हिसा आणि एच-४ व्हिसा धारकांचे कॉन्सुलर अधिकाऱ्यांद्वारे, एक्स, इन्स्टाग्राम, लिंक्डइन अकाऊंट तपासले जाणार आहे. यामध्ये राजकीय विचारांचा विरोधक किंवना रिज्युममध्ये चुका आढळल्यास त्यांचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. सध्या अमेरिकेतील अनेक टेक कंपन्या या नव्या नियमांमुळे चिंतेत आले आहेत. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्या सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाइलमधील राजकीय मीम्स टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच व्हिसा अर्जासाठी व्यावसायिक ई-मेल वापरण्यास सांगितले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या निमाबाबत माहिती देताना हा नियम त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला आहे. मात्र अनेकांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे म्हटले आहे. सध्या अमेरिकेच्या या नियमामुळे अनेकांच्या शिक्षण आणि नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भारतीयांसह अनेक परदेशी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे.
Ans: अमेरिकेच्या नव्या व्हिसा नियमानुसार, सर्व एच-१बी व्हिसा आणि एच-४ व्हिसा धराकांचे सोशल मीडिया अकाउंट्स तपासले जाणार आहे.
Ans: या नव्या नियमांनुसार, एच-१बी व्हिसा आणि एच-४ व्हिसा धारकांचे कॉन्सुलर अधिकाऱ्यांद्वारे, एक्स, इन्स्टाग्राम, लिंक्डइन अकाऊंट तपासले जाणार आहे.