Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JD Vance: जेडी व्हान्स यांनी अमेरिकेला दिली गुड न्यूज; व्हाईट हाऊस आनंदोत्सवात न्हाऊन निघाले, जाणून घ्या नेमके काय घडले?

US JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हान्स जुलै २०२६ च्या अखेरीस त्यांच्या चौथ्या अपत्याची अपेक्षा करत आहेत. या खास प्रसंगी व्हाईट हाऊसने त्यांचे अभिनंदन केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 21, 2026 | 02:50 PM
us vp jd vance wife usha vance pregnant fourth child july 2026 announcement

us vp jd vance wife usha vance pregnant fourth child july 2026 announcement

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हाईट हाऊसमध्ये आनंदाची बातमी
  • ऐतिहासिक घटना
  • व्हान्स दाम्पत्याचा भारत दौरा

JD Vance wife Usha Vance pregnant 2026 : अमेरिकेच्या सत्तेचे केंद्र असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकेचे तरुण उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स (JD Vance) आणि त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा व्हान्स (Usha Vance) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सुखद बातमी शेअर केली आहे. व्हान्स दाम्पत्याने जाहीर केले आहे की, ते त्यांच्या चौथ्या अपत्याची अपेक्षा करत असून, जुलै २०२६ च्या अखेरीस त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचे आगमन होणार आहे.

“आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत!”

व्हान्स दाम्पत्याने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “उषा गर्भवती असून जुलैमध्ये आमच्या चौथ्या मुलाचे स्वागत करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. उषा आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. या व्यस्त काळातही आमची आणि आमच्या मुलांची काळजी घेणाऱ्या लष्करी डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, ज्यांच्यामुळे आम्ही देशसेवा आणि कौटुंबिक आनंद दोन्ही एकत्र अनुभवू शकत आहोत.” व्हाईट हाऊसने देखील या बातमीचे स्वागत केले असून, ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “इतिहासातील सर्वात कुटुंब-अनुकूल (Pro-family) प्रशासन! अभिनंदन!”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO

उषा व्हान्स: एक कर्तृत्ववान भारतीय चेहरा

उषा व्हान्स (४०) या व्यवसायाने एक यशस्वी वकील आहेत. त्यांचे वडील कृष्णा चिलुकुरी आणि आई लक्ष्मी चिलुकुरी हे मूळचे आंध्र प्रदेशातील असून ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. उषा यांनी येल आणि केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसाठी ‘लॉ क्लर्क’ म्हणूनही काम केले आहे. जे.डी. व्हान्स आणि उषा यांची भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली होती आणि २०१४ मध्ये त्यांनी लग्न केले.

Usha Vance pregnant with 4th child, due in July, VP announces https://t.co/gAbFZuZeBS pic.twitter.com/E9Pc5BSXrV — New York Post (@nypost) January 20, 2026

credit – social media and Twitter

भारताशी असलेले खास नाते

व्हान्स कुटुंबाचे भारताशी घट्ट नाते आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान, उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी पत्नी उषा आणि त्यांच्या तीन मुलांसह (इवान, विवेक आणि मीराबेल) भारताचा पहिला अधिकृत दौरा केला होता. यावेळी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आग्रा येथील ताजमहाल तसेच जयपूरच्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली होती. भारतीय वारसा लाभलेल्या उषा व्हान्स यांच्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायातही या बातमीने आनंदाचे वातावरण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा

घटत्या जन्मदराबाबत व्हान्स यांची भूमिका

जे.डी. व्हान्स हे अमेरिकेतील घटत्या जन्मदराबद्दल नेहमीच चिंता व्यक्त करत आले आहेत. “मला अमेरिकेत अधिक बाळे जन्माला येताना पाहायची आहेत,” असे त्यांनी ‘मार्च फॉर लाईफ’ कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. आता स्वतः चौथ्यांदा बाबा होणार असल्याने, त्यांनी आपल्या ‘प्रो-फॅमिली’ विचारसरणीचा कृतीतून परिचय दिला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उषा व्हान्स यांचे चौथे बाळ कधी जन्माला येणार आहे?

    Ans: अधिकृत माहितीनुसार, उषा व्हान्स यांचे चौथे बाळ जुलै २०२६ च्या अखेरीस जन्माला येण्याची शक्यता आहे.

  • Que: उषा व्हान्स यांच्या मुलांची नावे काय आहेत?

    Ans: त्यांना सध्या तीन मुले आहेत - इवान (८), विवेक (५) आणि मुलगी मीराबेल (४).

  • Que: उषा व्हान्स यांचे मूळ गाव कोणते?

    Ans: उषा व्हान्स यांचे पालक मूळचे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील असून ते १९७०-८० च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले होते.

Web Title: Us vp jd vance wife usha vance pregnant fourth child july 2026 announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • America
  • international news
  • US White House

संबंधित बातम्या

Chabahar Port : ‘कोणीही आमची मैत्री तोडू शकत नाही’, चाबहार बंदरावरून इराणने अमेरिकेला दिला रोखठोक संदेश; India-Iran संबंध अतूट
1

Chabahar Port : ‘कोणीही आमची मैत्री तोडू शकत नाही’, चाबहार बंदरावरून इराणने अमेरिकेला दिला रोखठोक संदेश; India-Iran संबंध अतूट

India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता
2

India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता

Tariff War : ‘तर अब्जावधी डॉलर्स परत करावे लागतील!’ सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्पची धाकधूक वाढली
3

Tariff War : ‘तर अब्जावधी डॉलर्स परत करावे लागतील!’ सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्पची धाकधूक वाढली

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ
4

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.