US Politician's Daring Move Showing Nude Photo in Congress Sparks Global Reaction
वॉशिंग्टन: अमेरिकन संसदेत एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकन संसदेच्या खासदार नॅन्सी मेस या सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांनी अमेरिकन संसदेत असे काही कृत्य केले आहे की, यामुळे त्या चर्चेचा विषय ठरत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नॅन्सी मेस यांनी संसदेत त्यांचा न्यूड फोटो दाखवला. एवढेच नव्हे तर त्यांनी एक्स मंगेतरने (माजी होणारा पती) तिच्या संमतीशिवाय तिचे फोटो काढल्याचा आरोप केला आहे. तसेच एक्स मंगेतवर लैंगिक छळाचा देखील आरोप केला आहे.
या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या बैठकीदरम्यान ही घटना घडली. यावेळी नॅन्सी मेस यांनी व्हिडिओ व्ह्यूजरिमविरुद्ध कठोर कायदे करण्याची मागणी केली. त्यांनी संसदेत आपले न्यूड फोटो दाखवले. यावेळी त्यांनी “स्वातंत्र्य हा एक सिद्धांत नाही. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या परवानगीशिवाय आपण झोपेत असताना कोणीही आपला फोटो काढू शकत नाही. मी केवळ एक कायदेकर्त्या म्हणून नाही, तर एक पीडित म्हणून बोलत आहेत,” असे म्हटले. तसेच त्यांनी त्यांच्या एक्स मंगेतरवरही गंभीर आरोप केले.
खासदार नॅन्सी मेस यांनी संसदेत पोस्टरच्या आकाराचे ‘बॅल्क-व्हाईट’ फोटो दाखवले. त्यांनी त्यांच्या एक्स मंगेतरवर हे फोटो काढल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी म्हटले की, “मला माहित नव्हते की माझा व्हिडिओ बनवला जात आहे. व्हिडिओ बनवण्यास मी संमती दिली नव्हती” त्यांनी म्हटले की, ‘माझा एक्स मंगेतर पॅट्रिक ब्रायंटने माझे लपून व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत.’ एवढेच नव्हे तर नॅन्सी यांनी ब्रायंटवर लैंगिक छळाचा देखील आरोप केला आहे.
दरम्यान नॅन्सी मेस यांच्या एक्स मंगेतरने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ब्रायंटने म्हटले की, “नॅन्सी मेसने केलेल आरोप खोटे आणि बदनामकारक आहे. मी हे दावे स्पष्टपणे फेटाळतो. मी कधीही कोणावर लैगिंक अत्याचार केलेला नाही. कधीही कोणाच्याही परवानगीशिवाय फोटो काढले नाहीत असेही ब्रायंट यांनी सांगितले. ब्रायंट यांनी असेही म्हटले की, नॅन्सी मेस त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहे.
मेस यांनी ब्रायंटवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी फेब्रवारीमध्ये नॅन्सी मेस यांनी ब्रायंट आणि त्यांच्या तीन व्यापार भागीदारांवरही आरोप केला होता. नॅन्सी यांनी त्यांच्यावर आणि इतर काही महिलांवर ब्रायंट आणि त्याच्या बिझनेस पार्टनरवर लैगिंक छळ केल्याचा आरोप केला होता. सध्या दक्षिण कॅरोलिना राज्य कायदा अंमलबजावणी या प्रकरणाची चौकशी करत आहे.