तांदळावरील वादग्रस्त विधानामुळे गेली जपानच्या कृषी मंत्र्यांची खुर्ची; प्रकरण नेमकं आहे तरी काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
टोकियो: भारताच्या बिहारपासून पश्चिम बंगालपर्यंतच्या अनेक भागांमध्ये तांदळाची मोठी मागणी केली जाते. शिवाय भारताप्रमाणे जपानमध्येही तांदळाची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते. परंतु तांदाळामुळे जपानच्या कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मिळालेल्या माहितीननसार, जपानच्या कृषी मंत्र्यांनी तांदळाच्या उत्पादनावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे.
सध्या जपानमध्ये तांदळाला मोठी मागणी आहे. परंतु तांदळाच्या किमती देखील तितक्याच वाढल्या आहेत. यामुळे जपानी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकांमध्ये तांदळाच्या वाढत्या किंमतीमुळे संताप निर्माण झाला आहे. याच वेळी जपानचे कृषी मंत्री यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जपानमध्ये तांदळाची कमतरता भासत आहे. याच वेळी जपानचे कृषी मंत्री एटो यांनी सरकारने साठवलेल्या तांदळाच्या वितरणावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, मी स्वत: कधीही तांदूळ खरेदी केलेला नाही. खरे सांगायचे तर माझे समर्थक मला भरपूर भात देतात. माझ्या घरी पेंटीमध्ये इतका तांदूळ आहे की तो मी विकू शकतो.
एटो यांचे हे विधान त्यांच्यासाठी महाग पडले आहे. यामुळे कृषी मंत्री एटो यांनी आपली खुर्ची गमवावी लागली आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांनी देखील यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तांदळाच्या वाढत्या किमतींशी अडचणींमुळे ग्राहकांना आणि तांदूळ पिकवण्याऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच कृषी मंत्रींचे हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यांनी कृषी मंत्री एटो यांनी माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तांदळाच्या वाढत्या किमतींवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगितले आहेत.
जपानाच्या कृषी मंत्री एटो यांचे विधान त्यांच्या गळ्याचा काटा बनले आहे. यामुळे त्यांना जनतेची माफी तर मागावी लागली आहेच, परंतु त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे. पंतप्रधान कार्यालयात बुधवारी (२१ मे) रोजी त्यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर त्यांनी म्हटले की, “लोक वाढत्या तांदळाच्या किंमतीशी सामना करत असताना मी अत्यंत चुकीचे विधान केले. तसेच मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. पतंप्रधान शिगेरु इशिबा यांनी तो स्वीकारलाही आहे.
माझ्या राजीनाम्याचे कारण म्हणजे “मला वाटते की, मी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. यामुळे मी पदावर राहणे योग्य नाही. त्यांनी असेही सांगितले की, सरकारने तांदळाच्या किमतीं कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. कृषी मंत्री एटो यांनी माफी मागरितली आणि आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, ते स्वत: तांदूळ खरदे करतात आणि त्यांना तांदूळ भेट म्हणून दिला जात नाही.
जपानच्या कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ११ मे नंतर तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे देशातील सुमारे हजार सुपरमार्केटमध्ये ५ किलोच्या तांदळाच्या पिशवीची सरासरी किंमत ४ हजार २६८ येन होती. ही किंमत मागील आठवड्यात ५४ येन पेक्षा १.३ टक्क्यांनी वाढली आहे.