मेक इन इंडियाच्या 'या' लढाऊ विमानाची मैदानात उतरण्यापूर्वीच जगभरात चर्चा ; चीनची उडाली आहे झोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: सध्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेअंतर्गत केलेल्या कारवाईने पाकिस्तान हादरला आहे. तसेच यामुळे भारताची लष्करी तादक संपूर्णजगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. याच वेळी भारताच्या आणखी एका लढाऊ विमानाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. हे विमान मैदानात उतरण्यापूर्वीच यामुळे भारताच्या शत्रू देशांची झोप उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या मेक इन इंडिया या प्रकल्पांतर्गत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेशी ७.३ अब्ज डॉलर्सचा करार झाला. या अंतर्गत भारताला LhC प्रचंड च्या १५६ हेलिकॉप्टरच्या ऑर्डरला मान्यता दिली आहे. याद्वारे भारताचे संरक्षण क्षेत्रामध्ये स्थान अधिक उंचावले आहे. सध्या ही विमाने भारतीय सैन्याकडे पोहोचलेली नाही. परंतु याची जगभरात विशेषत: चीनमध्ये चर्चा सुरु आहे.
भारताचे नवीन लढाऊ विमान अत्यंत ताकदवार आहे. हे विमान चीनच्या z-10विमानाला सहजपणे नष्ट करु शकते. चीनच्या एका वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, भारत या लढाऊ विमानाचा वापर शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी करु शकतो. सध्या चीनची लष्कर भारतीय हवाई दलाच्या शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवून आहेत, हे यातून स्पष्ट होते.
Air to Air Missile Test firing by the Indian Indigenous Attack Helicopter #LCH Prachand
— Defence Decode® (@DefenceDecode) May 6, 2025
LhC प्रचंड हे भारतातील पहिले हल्ला करणारे लढाऊ विमान आहे. हे विमान सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएल) द्वारे भारतात डिझाइन आणि उत्पादित करण्यात आले आहे. हे लढाऊ विमान हवेतून जमिनीवर अचूकतेने हल्ला करण्यासाठी सण आहे. या लढाऊ विमानात ॲंटी-टॅंक, ॲंटी-इन्पट्री आणि क्लोज एअर सपोर्टच अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या विमानचे पहिले उड्डाण २०१० मध्ये करण्यात आले होते. भारतीय हवाई दलासाठी १० आणि लष्करासाठी पाच हेलिकॉप्टरची तुकडी २०२२ मध्ये सादर करण्यात आली होती. नवीन विमानांची डिलिव्हरी २०२८ ते २०३३ दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.
हे लढाऊ विमान दोन जणांच्या बसण्यायोग्य असून यामध्ये दोन टर्बोशाफ्ट इंजन आहेत. भारताने हे विमान फ्रेंच कंपनीच्या सहाय्याने विकसित केले आहे. या विमानात काचेचे कॉकपिट, नाईट व्हिजन, डिजिटल आणि लेजर सेन्सर आहेत. या विमानाची रचना हलकी आणि स्पष्ट आहे. हे विमान अगदी उंचावर उडू शकते.य यामध्ये २० मिमि तोफ बसवण्यात आली आहे. तसेच यामध्ये रॉकेट आणि बॉम्ब देखील बसवण्यात येऊ शकता. या विमानात व्हिजन कंट्रोल सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.