US President Donald Trump’s leaves for Middle East trip
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मध्य पूर्वे देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत आज डोनाल्ड़ ट्रम्प सौदी अरेबियाला भेट देतील. ट्रम्प यांचा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पहिलाच अधिकृत विदेश दौरा आहे. यापूर्वी पोप फ्रान्सिस यांच्या अत्यंसंस्कारात सहभागी होण्यासाठी ट्रम्प २६ एप्रिल रोजी व्हॅटिकनला गेले होते.
ट्रम्प मंगळावरी(१३ मे) सौदीची राजधानी रियाधमध्ये क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार आहेत. नंतर १४ मे रोजी आखाती नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभाग होणार आहेत. त्यानंतर त्यांचा दौरा कतारला असेल. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशे ते १५ मे रोजी यूएईला भेट देणार आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर युरोपीय देशे किंवा कॅनडा-आणि मेक्सिकोला भेट देण्याची परंपरा आहे. २०१७ ला राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला भेट दिली नव्हती.
ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सौदी अरेबियाचा त्यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरकुन चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेत स्थिरता, प्रादेशिक सुरक्षितता आणण्याच्या प्यत्नांवर भर दिला. तसेच दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठीच्या प्रयत्नांवर देखील चर्चा केलीय
तसेच सौदी अरेबियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबिया अमेरिकेत ६०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. तसेच अमेरिका देखील सौदी अरेबियात गुंतवणूक करमार आहे. ट्रम्प यांनी ही गुंतवणूक १ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवायची आहे.सौदी अरेबियाने सार्वजनिक गुंतवणूक निधी (PIF) मध्ये ९२५ अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत. सौदीने याद्वारे अमेरिकेत गुंतवणूक केली आहे.
तसेच अमेरिकेने यूएईमध्ये पुढील १० वर्षासाछी एआय सेमीकंडक्टर, उर्जा आणि पायभूत सुविधा क्षेत्रांमध्ये १.४ ट्रिलियन डॉलर्सच्या गुंतवणूकीची इच्छा व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या राष्ट्राध्यपदाच्या कार्यकाळात सौदीसह आखाती देशांशी संबंध मजबूत केले आहे. पद सोडल्यानंतरही ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचे त्यांचे जावई आणि माजी सहाय्यक जेरेड कुशनर यांच्या कंपनीत २ अब्ज डॉलर गुंतवले आहेत.सध्या ट्रम्प यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा त्यांच्या शुल्कामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे अमेरिकेच्या आर्थिक उत्पादनात घट झाली आहे. गेल्या तीन वर्षातील ही पहिली घट आहे, यावर चर्चा होणार आहे.
तसेच ट्रम्प यांना सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील संबंध देखील सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. यापूर्वी देखील पहिला कार्यकाळात त्यांनी यावर भर दिला होता. सौबी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी अशी इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.य सौदी अरेबियाच्या म्हणण्यानुसार, पॅलेस्टाईन पूर्व जेरुसेलमची राजधानी असावी आणि एक स्वतंत्र देश हवा. परंतु इस्रायलला हे मान्य नाही.