US president jo biden fairwell speech Says Oligarchy Taking Shape In America
वॉश्गिंटन: अमेरिकेचे पद सोडण्यापूर्वी अध्यक्ष जो बायडेन अलीकडच्या त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात कोणात्या कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनत आहेत. जो बायडेन यांनी अमेरिकेत श्रीमंत लोकांचा वाढता प्रभाव आणि चुकीच्या माहितीच्या धोक्यांवर जोर दिला. बायडेन यांनी म्हटले की, हे मुद्दे अमेरिकेच्या लोकशाहीसाठी गंभीर धोका ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एलॉन मस्कवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत तीव्र शब्दात टिका केली आहे.
काय म्हणाले जो बायडेन?
बायडेन यांनी आपल्या अखेरच्या भाषणात म्हटले आहे की, अमेरिकेतील मुट्ठीभर श्रीमंत लोकांच्या हाती शक्ती असणे हे देशाच्या लोकशाहीला धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यांनी चेतावणी दिली की यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येऊ शकतात आणि समान संधींचा अंत होऊ शकतो. बायडेन म्हणाले, “देशाला या शक्तींच्या चंगुलातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. अमेरिकेचा अर्थ आहे सर्वांना समान संधी मिळणे.”
It’s been the privilege of my life to serve our nation for over 50 years.
I’ve given my heart and soul to you, and I’ve been blessed a million times in return with the love and support of the American people.
Join me as I deliver my farewell address. https://t.co/DRr4U4sa7B
— President Biden (@POTUS) January 16, 2025
लोकशाही आणि स्वतंत्र पत्रकारितेवर जो बायडेन यांचे भाष्य
चुकीच्या माहितीच्या प्रसारावर आणि स्वतंत्र मीडियावर होणाऱ्या दबावावरही जो बायडेन यांनी भाष्य केले आहे. त्यांनी आजकाल मीडियावर प्रचंड दबाव आहे आणि स्वतंत्र पत्रकारिता संपत चालली असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या माहितीचे प्रसारण होण्याचे संकट अमेरिकेसाठी मोठी आव्हान बनले आहे, यावर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे.
जो बायडेन यांनी लोकशाहीचा आदर यावरही आपले विचार मांडले आहेत. अमेरिकेला लोकशाहीचा प्रतीक मानले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेचा अर्थ म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा आदर करणे.” त्यांनी सांगितले की, खुले समाज आणि स्वतंत्र पत्रकारिता हे अमेरिकेच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत.
अखेरच्या भाषणातील मुद्दे
आपल्या प्रशासनाच्या कामगिरीवर चर्चा करताना, बायडेन यांनी नाटोला अधिक मजबूत करणे, गन सेफ्टी कायद्यांचा अंमल करणे आणि वयोवृद्धांसाठी औषधांच्या किमती कमी करणे यासारख्या काही प्रमुख कामांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, या धोरणांचा दीर्घकालीन लाभ देशाला होईल. बायडेन यांचे हे अंतिम भाषण अमेरिकेतील नवीन आव्हानांवर केंद्रित होते. त्यांनी श्रीमंतांचे वाढते वर्चस्व, चुकीच्या माहितीचे प्रसार आणि लोकशाहीच्या आदर यांसारख्या मुद्यांवर देशाला सावध केले. हे भाषण त्यांच्या प्रशासनाच्या एका महत्त्वपूर्ण आठवणीच्या रूपात लक्षात राहील.