
Trump on Tarrif
ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण
दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफवर (Tarrif) एक मोठे विधान केले आहे. त्यांनी प्राइमटाइममध्ये देशाला संबोधित करताना त्यांच्या निर्णयांमुळे आणि धोरणांमुळेच जगातील अनेक युद्ध थांबली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी टॅरिफला आवडते शस्त्र म्हणत त्यांच्या या धोरणामुळे त्यांना आणि अमेरिकेला मोठी ताकद मिळाली असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, टॅरिफुळे अमेरिकेची शक्ती जगाला समजली आहे. शिवाय यामुळे जागतिक पातळीवर दबाव निर्माण करणे सोपे आहे. यामुळे टॅरिफ हा शब्द मला अधिक लोकप्रिय आहे, आणि त्यांच्या या धोरणामुळेच त्यांनी जगभरातील संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या उद्योगांना संरक्षण मिळाले आहे, तसेच महसुलातही वाढ झाली आहे.
ट्रम्प यांनी कोणत्या देशांवर किती टॅरिफ लावले टॅरिफ लादले आहे. ९० हून अधिक देशांनवर त्यांनी टॅरिप लागू केले असून सर्वाधिक टॅरिफ भारतावर आणि ब्राझीवर लावले आहे. भारतावर त्यांनी ५०% कर लागू केला असून यामध्ये रशियाकडून तेल खरेदीमुळे अतिरक्त २५% कराचा समावेश आहे. ब्राझीलवरही ट्रम्प यांनी ५०%, व्हेनेझुएलावर २५ टक्के, मेक्सिकोवर विविध वस्तूंवर ५ ते ५०% टॅरिफ लादले आहे.
ट्रम्प यांनी २०२५ मध्ये टॅरिफच्या दबावमुळे आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धासह इस्रायल-इराण (Israel Iran War), थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान, इस्रायल-हमास (Israel Hamas War) ही आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, थायलंड कंबोडिया, ही युद्ध टॅरिफ दबावामुळेच थांबली असल्याचा दावा त्यांनी केला होता. याशिवाय गाझातील संघर्ष हा त्यांच्या धोरणांमुळेच थांबला असल्याचाही दावा त्यांनी केली.
दरम्यान २०२६ च्या अजेंडावर बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, सध्या इराणमध्ये अणु शस्त्रांची निर्मिती सुरु आहे, तो धोका अजूनही टळलेला नसल्याचे म्हटले. ट्रम्पच्या या सर्व विधानांवरुन लक्षात येते की, ट्रम्प आपल्या दबावी धोरणांचा वापर येत्या वर्षासाठी करणार आहेत.
Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?
Ans: ट्रम्प यांनी पुन्हा त्यांच्या टॅरिफमुळे आणि त्यांच्या विरोधी धोरणांमुळे जगभरातील युद्ध थांबली असल्याचा दावा केला आहे.
Ans: ट्रम्प यांनी आठ युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते, टॅरिफमुळे अमेरिकेच्या उद्योगांना संरक्षण मिळाले आहे, तसेच अमेरिकेची ताकद यामुळे जगाला समजली आहे आणि यामुळेच जगभरातील संघर्ष थांबली असल्याचे त्यांचे मत आहे.