Trump New Tarrif : ट्रम्प भारतावर पुन्हा आक्रमक ; आणखी टॅरिफ लावण्याचे दिले संकेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा कॅनडावर नाराज! ‘या’ कारणावरुन उसळला वाद ; लावला १०% अतिरिक्त कर
सोमवारी (०८ डिसेंबर) रोजी व्हाउट हाउसमध्ये ट्रम्प यांनी शेती आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि मंत्रीमंडळासह, ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट आणि कृषी सेक्रेटरी ब्रुक रोलिन्स यांच्यासह एक गोलमेज बैठक घेतली. या बैठकीत अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज निधीची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांनी अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर थेट भारताबद्दल प्रश्न केला. त्यांनी म्हटले की, मला भारताबद्दल सांगा? भारत अमेरिकेत स्वस्त तांदूळ का डंप करत आहे, त्यांना असे करण्याची परवानगी कोणी दिली असे ट्रम्प यांनी म्हटले.
गोलमेज बैठकीदरम्यान अमेरिकेच्या दक्षिण भागातील केनेडी राइस मिलचे प्रमुख मेरिल केनेडी यांनी सांगितले की, भारत, थायलंड आणि चीन अमेरिकेत अतिशय स्वस्त दरात तांदूळ विकत आहे. यामुळे अमेरिकन तांदूळ उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेत तांदळाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत, मात्र या आशियाई देशांच्या स्वस्त दरांमुळे त्यांच्या तांदळाची मागणी अधिक वाढली आहे. हे ऐकल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केली.
त्यांनी मंत्री स्कॉट बेसंट यांना भारताला स्वस्त दरात तांदूळ विकण्याची परवागी आहे का? असे विचारले. यावर बेसंट यांनी सध्या भारताशी चर्चा सुरु असून अशा कोणतीही सूट नसल्याचे म्हटले. यानंतर ट्रम्प यांनी ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय तांदळावर टॅरिफ लादण्याची धमकी दिली. बेकायदेशीरपणे वस्तू आयात करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादून समस्या सोडवली जाईल असे त्यांचे मत आहे. एका दिवसांत ही समस्या सुटेल असे ट्रम्प यांनी म्हटले.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार आहे. २०२४-२५ मध्ये जागितक तांदूळ निर्यातीत भारताने ३०.३ टक्के वाटा दिला होता. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सोना मसुरा या तांदळाची मागणी अधिक आहे. सध्या ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर ५०% कर लादला आहे. हा कर अधिक वाढल्या भारतीय शेतकऱ्यांवर मोठे संकट येईल. शिवाय यामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फोडला टॅरिफ बॉम्ब! २५% कर लागू केल्याने ‘या’ क्षेत्रांना बसणार फटका






