अमेरिकेच्या अहवालात इराण 39 वर्षांपासून दहशतवादाचा समर्थक; पाकिस्तानचे मात्र नावही नाही ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेने इराणला पुन्हा एकदा स्थान दिले आहे. या अहवालात अमेरिकेने मध्यपूर्वेतील अशांततेसाठी इराणला जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात इराणचे वर्णन दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून करण्यात आले आहे. अमेरिका गेल्या 39 वर्षांपासून इराणला सतत या अहवालात ठेवत आहे. इराणवर मध्यपूर्वेत अशांतता पसरवण्यासाठी आपल्या प्रॉक्सी गटाचा वापर केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने जारी केलेल्या वार्षिक कंट्री रिपोर्ट ऑफ टेररिझम (सीआरटी) मध्ये 1984 पासून इराणचे नाव सातत्याने नमूद केले जात आहे, ज्यामध्ये हिजबुल्लाह, हमास आणि हुथी सारख्या बंडखोर संघटनांना इराणचा पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे.
इराण व्यतिरिक्त इतर कोणते देश यात सामील आहेत?
या अहवालात इराणशिवाय सीरिया, उत्तर कोरिया आणि क्युबा यांसारख्या इतर देशांनाही दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, इराणला अव्वल स्थान देण्यात आले आहे. 1979 च्या क्रांतीनंतर पाच वर्षानंतर इराण सातत्याने या यादीत दिसत आहे. याआधी या यादीत कोणत्याही देशाचा समावेश नव्हता. गुरुवारी ( दि. 12 डिसेंबर ) प्रसिद्ध झालेल्या 2023 CRT अहवालात इराणवर प्रामुख्याने इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स-कुड्स फोर्स (IRGC-QF) च्या माध्यमातून ‘दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर क्रियाकलापांना’ पाठिंबा देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतापुढे झुकली चिनी आर्मी; डेपसांगमधून 3 लष्करी चौक्या हटवल्या, 20 किमी हटले मागे, पहा सॅटेलाईट फोटो
इराणसाठी अहवालात काय लिहिले होते?
अहवालात म्हटले आहे की, IRGC-QF च्या माध्यमातून इराणने या भागातील अनेक दहशतवादी गटांना पैसा, प्रशिक्षण, शस्त्रे आणि उपकरणे पुरवली आहेत, जे यापैकी अनेक हल्ले घडवून आणण्यासाठी जबाबदार आहेत. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इराण-समर्थित गटांनी त्यांच्या कारणांसाठी संघर्षाचा फायदा घेतला. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यांबाबत इराणला पूर्वीपासून माहिती असल्याचा कोणताही पुरावा नसून हमासला दीर्घकालीन मदत मिळाल्याने हा हल्ला करण्यात सक्षम झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन तयार करत आहे सुपर पायलटची फौज; अमेरिकेला देणार टक्कर, ड्रॅगन वापरत आहे शेकडो वर्षे जुने तंत्रज्ञान
पाकिस्तानचे नावही नाही
अनेक तज्ज्ञ या अमेरिकन अहवालाला धक्कादायक मानत आहेत, कारण या अहवालात दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचे नाव नाही. तर भारत सरकारने अनेकवेळा पाकिस्तानवर भारताविरुद्ध दहशतवाद्यांना मदत केल्याचा, त्यांना पैसा आणि प्रशिक्षण दिल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या दहशतवादाच्या यादीत अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे ज्यांना पाकिस्तानने अटक केलेली नाही.