मोठी बातमी! अमेरिकेच्या दोन खासदारांची हत्या, घरात घुसून घातल्या गोळ्या
अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार करण्यात आला आहे. यात एक महिला खासदार आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या असून संपूर्ण अमेरिकेत खळबळ माजली आहे. मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांच्या पतीचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून स्टेट सीनेटर जॉन हॉफमॅन गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर पोलिस वेशात आला होता. गोळीबाराची घटना मिनियापोलिसच्या उपनगरांमध्ये चैम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत घरांमध्ये प्रवेश केला. स्थानिक प्रशासनाने हा एक टार्गेटेड हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
Minnesota lawmaker killed, state Senator injured in shooting; Trump says “such horrific violence will not be tolerated”
Read @ANI Story | https://t.co/rf9PUTHCA3
#Minnesota #US #DonaldTrump #MelissaHortman #JohnHoffman pic.twitter.com/5s2SgiL1JK
— ANI Digital (@ani_digital) June 14, 2025
“हा केवळ मिनेसोटासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी धोक्याचा इशारा आहे. कोणतीही राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. हल्लेखोर अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे गोळीबारानंतर दोन्ही उपनगरांतील रहिवाशांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
BREAKING: Minnesota Senator John Hoffman (D) and State Rep. Melissa Hortman (D) have been shot at their homes. Condition unknown – KMSP/KSTP #NoKings pic.twitter.com/cVR2JbMejX
— Morgan J. Freeman (@mjfree) June 14, 2025
मिनेसोटा पोलिसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताच्या गाडीतून एक “मॅनिफेस्टो” सापडले असून त्यामध्ये अनेक राज्यातील लोकप्रतिनिधींची नावे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इस्रायलकडे ‘Iron Dome’ ही ताकत असतानाही इराणने कसा केला संरक्षण मुख्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला?
संशयिताची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही, मात्र त्याचे हेतू राजकीय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणांकडून या घटनेमागे एखादं मोठं कटकारस्थान असण्याची शक्यता तपासली जात आहे.. सध्या एफबीआय, स्थानिक पोलिस आणि इतर संघीय एजन्सी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. राज्यातील इतर जनप्रतिनिधींना देखील तात्काळ अतिरिक्त सुरक्षा पुरवली जात आहे.