US stop cyber operations against Russia decision taken before the Trump-Zelensky meeting
वॉशिंग्टन: एकीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी वाद सुरु असताना ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी रशियाच्या विरोधात सुरु असलेल्या सायबर ऑपरेशन्सन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे संरत्रण मंत्री पीट हेगसेथ यांनी यासाठी सायबर कमांडला आदेश दिले आहेत. पेंटागॉनशी संबंधित एका गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे आदेश ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या भेटीपूर्वीच देण्यात आले होते.
निर्णयाचा हेतू
या निर्ययाचा उद्देश युक्रेन युद्ध संपवण्याच्या चर्चेत रशियाला सहभागी करुन घेणे असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प प्रशासन रशियाच्या विरोधातील सर्व कारवायांचा आढावा घेत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की, पुतिनविरोधी आक्रमक धोरण स्वीकारले गेले, तर रशियाला चर्चेत सामील करणे कठीण जाईल.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन देशांतील राजनैक आणि संवेदनशील चर्चा होण्यापूर्वी अशी प्रकारचे सायबर कायवाया थांबवणे नेहमीची प्रक्रिया आहे. मात्र, रशियाच्या विरोधातील कायावायांपासून माघर घेणे मोठे धाडसाचे पाऊल मानले जात आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या मते, रशिया सात्यत्याने अमेरिरकी नेटवर्कमध्ये घुसखोर करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प प्रशासन कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यातच रशियाने अमेरिकेत सायबर हल्ल्याद्वारे घुसखोरी केली होती.
अमेरिकेतील सायबर हल्ल्यांत वाढ
गेल्या काही वर्षांत अमेरिकेत रुग्णालयांमध्ये आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर रॅन्समवेअर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश हल्ले रशियातून घडल्याची पुष्टी झाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, या हल्ल्यांना रशिययाच्या सरकारी एजन्सींचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळतो.
युरोपमध्येही अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. युरोपमध्ये महत्त्वाच्या कम्युनिकेशन केबल्स कापण्याचा प्रयत्न, तसेच जर्मनीतील एका मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादक कंपनीच्या CEO च्या हत्येचा कट असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अमेरिकेने युरोपला या धोक्यांपासून वाचवण्यासाठी आतापर्यंत मदत केली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या रशियाच्या विरोधातील साइबर ऑपरेशनवर बंदी घातल्यास, युरोपियन देशांना अधिक समस्यांचा सामना करावा लागेल.
अमेरिकन निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप
मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप वाढला होता. रशियाने मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात अमेरिका सायबर कमांडने गुप्त ऑपरेशन हाती घेतले होते. आता ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या विरोधातील सायबर ऑपरेशनवर बंदी घातल्याने अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो.