झेलेन्स्कीच नव्हे, तर 'या' देशांच्या नेत्यांशीही भिडले ट्रम्प; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय घेतले यामुळे जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला. तेव्हापासून ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी या दरम्यान विविध देशांच्या नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला आणि जपानी पंतप्रधान इशिबा यांचा समावेश आहे. या नेत्यांची ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या केवळ 40 दिवसांत भेट घेतली. भेटीदरम्यान अनेक वेळा वादविवाद झाले. विशेषत: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों आणि जॉर्डनचे किंग अब्दुल्लाह यांच्यासोबत त्यांच्या तणावपूर्ण चर्चा झाल्या.
ट्रम्प आणि झेलेन्स्की वाद
फेब्रुवारी 28 रोजी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्हाइट हाऊमध्ये ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करण्याचा आरोप केला आणि त्यांना फटकारले. हा वाद इतका वाढला की, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी यामध्ये मध्यस्थी करावी लागली. या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या वादाची चर्चा जागतिक स्तरावर सुरु असून झेलेन्स्कींना युरोपियन देशांकडून पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प विलिन बनले आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्यासी मतभेद
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनीही व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती. संयुक्त पत्रकार परिषदेदम्यना ट्रम्प यांनी युरोपियन देशांना केवळ कर्जाच्या स्वरुपात यूक्रेनला मदत केल्याचा दावा तेला. मात्र, मॅक्रों यांनी याला विरोध करत स्पष्ट केले की, त्यांची मदत शांततेसाठी होती, कर्जासाठी नव्हे.
जॉर्डनच्या किंग अब्दुल्लाह यांना धमकी
जॉर्डनचे किंग अब्दुल्लाह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यन ट्रम्प यांनी गाझा पट्टीवर अमेरिकेचा ताबा असल्याचे सांगितले. त्यांनी जॉर्डन यांना पॅलेस्टिनी निर्वासितांना त्यांच्या देशात स्थान देण्यास सांगितले, मात्र अब्दुल्लाह यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी जॉर्डन आणि इजिप्तला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत कपात करण्याची धमकी दिली.
इतर नेत्यांची भेट
याशिवाय, ट्रम्प यांचे जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत व्यापर तुटीच्या मुद्दयावर चर्चा झाली. परंतु ही भेट उत्कृष्ट ठरली. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी यूक्रेनमधील ब्रिटिश सैन्याच्या मदतीसंदर्भात संभ्रम निर्माण करणारी विधाने केली.
या सर्व घटनांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दृष्टिकोनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. त्यांच्या निर्णयपद्धतीवर आणि जागतिक नेत्यांशी वागण्याच्या पद्धतीवर अनेक देशांमध्ये चर्चा सुरु असून टीका केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलचा रमजानच्या काळात ‘हा’ मोठा निर्णय; जागतिक स्तरावर खळबळ