डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून केले घोषित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरवातीस अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला असून जगाला हादरवून टाकले आहे. आता ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून घोषित करत कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या 250 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
स्थलांतरित आणि बहुभाषिक समाजता एकतेसाठी निर्णय
यापूर्वी अमेरिकेची कोणतीही अधिकृत भाषा नव्हती. देशातील स्थलांतरित आणि बहुभाषिक समाजात एकता आणण्याच्या उद्देशाने हे पाउल ट्रम्प यांनी उचलेले आहे. व्हाइट हाउसने ट्रम्प यांच्या जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार, सरकारी संस्था आणि संघराज्यीय निधी मिळणाऱ्या संघटनांना इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये सेवा आणि कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही, यामुळे 2 हजारमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी केलेले आदेश रद्द होतात.
काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इंग्रजीला अधिकृत भाषा बनविण्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढेल, सामायिक मूल्ये बळकट होतील आणि सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम होईल. आदेशात असेही नमूद करण्यात आले आहे की, “आपल्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासून” इंग्रजी ही अमेरिकेची प्राथमिक भाषा आहे. अमेरिकेचे ऐतिहासिक शासकीय दस्तऐवज, स्वातंत्र्याची घोषणा आणि संविधान, सर्व इंग्रजीत लिहिलेले होते.
Executive Order Alert! 🇺🇸
ENGLISH IS NOW THE OFFICIAL LANGUAGE OF THE UNITED STATES.
America is SO BACK! pic.twitter.com/j7veShXHVt
— The White House (@WhiteHouse) March 2, 2025
स्थलांतरित समुदायांमध्ये चिंतेचे वातावरण
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे स्थलांतरित समुदायंमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे, कारण इंग्रीज न बोलणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या सेवांपर्यंत पोहोचण कठीण होऊ शकते. विशेषत: पोर्तो रिको सारख्या स्पॅनिश भाषिक प्रदेशांमध्ये सांस्कृतिक ओळख आणि सहभागाबदद्ल चिंता वाढला आहे.
अमेरिकेतील इतर भाषा
इतिहासात, अमेरिकेने कधीही अधिकृत भाषा निश्चित केलेली नव्हती, कारण स्थापनेच्या वेळी इंग्रजी व्यापकपणे बोलली जात होती आणि संस्थापकांना इतर भाषा बोलणाऱ्या नागरिकांना परके वाटू नये अशी इच्छा होती. आज, अमेरिकेत 350 हून अधिक भाषा बोलल्या जातात. सरकारी आकडेवारीनुसार, अमेरिकेत सुमारे 68 दशलक्ष लोक इंग्रजी व्यतिरिक्त भाषेचा वापर करतात. 4 कोटींहून अधिक लोक स्पॅनिश भाषा बोलतात. यामध्ये स्पॅनिश, चिनी, टागालोग, व्हिएतनामी आणि अरबी या प्रमुख आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील भाषिक विविधतेवर आणि नागरिकांच्या सेवांवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलचा रमजानच्या काळात ‘हा’ मोठा निर्णय; जागतिक स्तरावर खळबळ