
US strikes in Caribbean Sea alleged drug boats unacceptable says UN
UNHRC Slams Trump Administration: वॉशिंग्टन : गेले काही महिन्यांपासून अमेरिका (America) आणि व्हेनेझुएलामध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हेनेझुएलावर अमेरिकेत तस्करी केल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकन सैन्याला कॅरेबियन समुद्रातील तथाकथित अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान अमेरिकेच्या या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांनी तीव्र टीका केली आहे.
US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे
संयुक्त राष्ट्रा मानवाधिकार आयोगाने (UNHRC) ने अमेरिकेला कडक शब्दांत फटकारले आहे. कॅरेबियन समुद्रातील अमेरिकेच्या कारवाईला UNHRC बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. जिनिव्हामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने कॅरेबियन समुद्रातील हल्ले लवकरात लवकर थांबवावेत. तसेच त्यांनी हल्ल्याच्या सखोल चौकशीचीही मागणी केली आहे.
गेल्या एका महिन्यात अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात किमान २२ जहाजांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, या जहाजांद्वारे दक्षिण अमेरिका देश व्हेनेझुएलातून अंमली पदर्थांची तस्करी केली जाते. पण UNHRC ने, या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे.
UNHRC च्या प्रवक्त्या रवीना शमदसानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाधिकार उच्चायुक्त टर्क यांनी अमेरिकेने या कारवायांवर पुनर्विचार करावा असे सांगितले आहे. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होत असून याला UNHRC ने अस्वीकार्य म्हटले आहे. केवळ संशयाच्या आधारावर हल्ले करुन कोणाचीही हत्या हे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे टर्क यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
परंतु ट्रम्प यांनी या कारवाईला समर्थन केले असून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या देशात अंमली पदर्थांची तस्करी रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पण संयुक्त राष्ट्रांनी अणेरिकेच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी हल्ले थांबवण्याचे आवाहन अमेरिकेला केले आहे. यामुळे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. UNHRC अमेरिकेवर का आणि कोणत्या शब्दात फटकारले?
संयुक्त राष्ट्रा मानवाधिकार आयोग (UNHRC) अमेरिकेच्या कॅरेबियन सुद्रातील जहाजांवरील हल्ल्यांवर तीव्र टीका केली आहे. UNHRC ने म्हटले आहे की, अमेरिकेच्या कॅरेबियन समुद्रातील तथाकथित अमंली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जहाजांवर हल्ला केवळ संशयिताच्या आधारे करणे बेकायदेशीर आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार हल्ल्यांचे उल्लंघन होत आहे.
प्रश्न २. अमेरिकेने कॅरेबियन हल्ल्यांबाबत काय स्पष्टीकरण दिले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरेबियन समुद्रातील हल्ल्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दक्षिण अमेरिका देश त्यांच्या राष्ट्रात अंमली पदर्थांची तस्करी करत आहेत. यामुळे ही तस्करी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हल्ले करणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न ३. UNHRC ने अमेरिकेकडे काय मागणी केली आहे?
UNHRC ने अमेरिकेला कॅरेबियन समुद्रातील हल्ले तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी हल्ल्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू