US Tarrif Harward Lutnick calls on India for open markets
Trump Tarrif : गेल्या काही काळाच अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या भारतावरील टॅरिफमुळे मोठी खळबळ सुरु आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (Tarrif) लादले असून यामुळे अमेरिका आणि भारतामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. अमेरिकेचे अधिकारी भारतावर सतत टीक करत आहेत. नुकतेच ट्रम्प यांचे सहकारी आणि अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ल्यूटनिक यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, भारत, ब्राझील, आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांनी आपले बाजार अमेरिकेसाठी खुले केले पाहिजेत. अमेरिकेला आर्थिक नुकसान पोहोचवणाऱ्या धोरणे त्यांनी बदलली पाहिजेत. ल्युटनिक यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले की, सित्झर्लंड, ब्राझील, आणि भारतासारख्या देशांनी सुधारण्याची गरज आहे. या देशांनी अमेरिकेच्या बाजार पेठांना योग्य प्रतिसाद द्यावा आणि अमेरिकेच्या हिताला धोका पोहचवणाऱ्या निर्णयांपासून लांब राहावे.
UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृ्त्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक
याच पार्श्वभूमीवर ल्यूटनिक यांनी भारताच्या व्यापार धोरणावरही टीका केली. त्यांनी म्हटले की, भारत व्यापार चर्चेत कोणताही ठोस निर्णय घेतल नाही. चर्चेत भारताची भूमिका मोठ्या प्रमाणात प्रतीकात्मक स्वरुपाची राहिली आहे. पण त्यांच्या मते, लवकरच भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यास तयार होईल हे नक्की.
यामागे कारण देताना त्यांनी म्हटले की, भारतीय उद्योजक मोदी सरकारवर अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यास भाग पाडतील. त्यांनी म्हटले की, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. यामुळे सुरुवातीला सगळेच लोक त्यांच्यांशी लढण्याचे ढोंग रचतात. पण शेवटी त्यांच्याच देशातील उद्योजक सरकारला अमेरिकेसोबत करार करणे योग्य असल्याचे सांगतात. असेच भारतासोबतही होईल असे ल्युटनिक यांनी म्हटले.
ल्युटनिक यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला महान सांगत त्यांनी, आम्ही जगातील सर्वात मोठे ग्राहक आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही ३० ट्रिलियन डॉलरची आहे. आणि ही जगाच्या शक्तीचे केंद्र आहे, असे ल्युटनिक यांनी म्हटले. यामुळे ब्राझील, भारत, आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांना त्यांच्याकडे परत यावेच लागेल. ल्युटनिक यांच्या या विधानामुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यापातील तमाव पुन्हा एकदा स्पष्ट झाल आहे.
टॅरिफवरुन भारतावर अमेरिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याने केली टीका?
टॅरिफवरुन अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे सचिव हॉवर्ड ल्यूटनिक यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.
हॉवर्ड ल्यूटनिक भारताबद्दल काय म्हटले?
भारत, ब्राझील, आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांनी आपले बाजार अमेरिकेसाठी खुले केले पाहिजेत. अमेरिकेला आर्थिक नुकसान पोहोचवणाऱ्या धोरणे त्यांनी बदलली पाहिजेत, असे ल्युटनिक यांनी म्हटले.
भारतीय उद्योगपतींबद्दल ल्युटनिक यांनी काय व्यक्तव्य केले?
ल्युटनिक यांनी म्हटले की, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा ग्राहक असून त्याची अर्थव्यवस्थाही सर्वाधिक आहे. यामुळे भारतीय उद्योजक मोदी सरकारवर अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यास भाग पाडतील.