
US Trump Administration rvocked 85000 Visas since January amid Immigration crackdown
अमेरिकेच्या परराष्ट्रविभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ८५,००० व्हिसा रद्द करण्यात आले आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि परराष्ट्र सचिव रुबियो यांनी दिलेल्या आदेशानुसार, ही कारवाई केली जात आहेत. सध्या ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा सुरक्षित करण्याचे धोरणा हाती घेतले आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले असल्याचे मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, परदेशी विद्यार्थ्यांमध्ये आतापर्यंत ८,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या, हल्ला आणि चोरी सारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच अमेरिकेत व्हिसा संपल्यानंतरही ओव्हरस्टेइंग करणाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
याशिवाय सर्वाधिक गाझातील विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहे. इस्रायलविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष लक्ष्य करण्यात आले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांवर व्हिसा निर्बंध देखील लागू करण्यात आले आहे. यहूदी-विरोधी नारेबाजी, निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याने त्यांच्यावर हे लेबल लावण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांवर घडलेल्या गोळीबार एका अफगाण नागरिकाचा समावेश होता. यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानतील नागरिकांचे व्हिसा देखील निलंबित केले आहेत.
सध्या ट्रम्प प्रशासना व्हिसा धोरणांमध्ये कठोर बदल करत आहे. तपासणी देखील कडक करण्यात आली आहे. नुकतेच ट्रम्प यांनी फॅक्ट-चेकिंग, कंटेंट मॉडरेशन, ट्रस्ट अँड सेफ्टी, ऑनलाइन सेफ्टी किंवा कंप्लायन्स क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली होती.
तसेच आता सर्व एच-१बी व्हिसा धारकांची तपासणी देखील कडक केली जाणार आहे. यामुळे आतापर्यंत व्हिसा रद्द प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अचानक कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांचा, व्यक्तीचा, कामगारांचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाने आतापर्यंत १९ देशांमधून प्रवेशास बंदी घातली आहे. अनेक इमिग्रेशन मार्ग देखील ट्रम्प प्रशासनाने बंद केले आहेत.
85,000 visa revocations since January. President Trump and Secretary Rubio adhere to one simple mandate, and they won’t stop anytime soon⤵️ pic.twitter.com/fbNYw9wj71 — Department of State (@StateDept) December 9, 2025