३० हून अधिक देशांमधून अमेरिकेत प्रवेश बंदी घालण्यात येणार बंदी; लवकरच डोनाल्ड ट्रम्प जाहीर करणार यादी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत चर्चांमध्ये जवळपास दोन डझनपेक्षा अधिक देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास रोखण्याचा विचार केला जात आहे. भविष्यात या यादीत आणखी देशांची भर पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) कडूनही या बातमीला दुजोरा दिला असून, अद्ययावत प्रवासबंदी यादी लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘असा पराभव करू की, Peace Plan साठी कोणीही उरणार…’ ; रशियन PM Putin यांच्या आक्रमक विधानाने संपूर्ण जगाचे लक्ष मॉस्कोकडे वळवले
या कठोर भूमिकेमागे मुख्य कारण म्हणजे वॉशिंग्टन डीसी येथे नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांवर झालेला भीषण गोळीबार. या हल्ल्यात एका महिला सैनिकाचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय अँड्र्यू वुल्फ गंभीर जखमी झाला. या हल्ल्याचा आरोप एका अफगाण नागरिकावर करण्यात आला असून, या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला थेट आव्हान देणारी ही घटना मानली जात असून, त्यानंतर प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली.
Trump travel ban could expand to 30 countries after DC National Guard shooting – list coming ‘soon’ https://t.co/9JHLVoMO17 pic.twitter.com/3ZusM7sRrj — New York Post (@nypost) December 3, 2025
credit : social media and Twitter
या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने सर्व प्रलंबित आश्रय अर्ज तात्पुरते निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, १९ देशांना ‘गंभीर चिंता’ श्रेणीत टाकण्यात आले असून, त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या कागदपत्रांची आणि पार्श्वभूमीची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सध्या अमेरिकेत असलेल्या सुमारे ७ लाखांहून अधिक लोकांची पुनर्तपासणी करण्याचाही समावेश आहे, ज्यामुळे स्थलांतर आणि सुरक्षा धोरणांबाबत मोठा बदल दिसून येत आहे.
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्ती नोएम यांनीही सोशल मीडियावरून या निर्णयाचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिकेच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या देशांबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. या विधानामुळे ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. देशाची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हिमालयाचे अस्तित्व अन् भारताचा विनाश’, ‘हे’ एकच कारण ठरणार प्रचंड विध्वंसक; BISच्या भूकंप नकाशामुळे 75% लोकसंख्या धोक्यात
या संभाव्य प्रवासबंदीमुळे जागतिक राजकारणावर तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास आणि व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक देशांचे नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि पर्यटक यांच्यासाठी अमेरिकेचे दरवाजे अंशत: किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतात. त्यामुळे हा निर्णय केवळ अमेरिकेपुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे अधिकृत यादी कधी जाहीर होणार आणि त्यात कोणकोणते देश असणार? हा निर्णय लाखो लोकांच्या भवितव्यावर परिणाम करणारा ठरणार असल्याने, जगभरातून या घोषणेकडे लक्ष वेधले गेले आहे.
Ans: लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित.
Ans: किमान ३० पेक्षा अधिक.
Ans: परदेशी नागरिक, प्रवासी आणि आश्रयार्थींवर.






