
Vivek Ramaswamy
US Iran Conflict : युद्ध थांबले? ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली, दिला ‘हा’ कडक इशारा
विवेक रामास्वामी हे तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील उद्योजक आहेत. २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरल्यानंतर त्यांना जगभरात मोठी ओळख मिळाली होती. नंतर त्यांनी माघार घेतली, परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. ओहायोमध्ये त्यांच्या विजयाने अध्यक्ष ट्रम्प देखील चकित झाले आहेत. त्यांनी विवेक यांचे तरुण आणि हुशार नेता म्हणून वर्णन केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रामास्वामी यांनी प्रसिद्ध कार डिझायनर आणि युट्युब स्टार केसी पुत्श यांना पराभूत केले आहे. केसी पुत्श यांनी सोशल मीडियावरुन रामास्वामी यांनी आव्हान दिले होते. परंतु रामास्वामींच्या धोरणांना जनतेकडून पाठिंबा मिळाला.
त्यांनी आपल्या विजयी भाषणात म्हटले, “ओहायोच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पण खरी लढाई अजून बाकी आहे, आमचे मुख्य उद्दिष्ट नोव्हेंबरमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणुक जिंकणे हाच आहे.”
सध्या सर्वांचे लक्ष नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अंतिम सार्वत्रिक निवडणुकीकडे लागले आहे. रामास्वामी डेमोक्रॅटिक पक्षाचे एमी ॲक्टन यांच्याशी लढत देणार आहेत. ॲक्टन हे ओहायोचे माजी आरोग्य संचालक आहेत. कोविड काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची लोकप्रियता अधिक आहे. यामुळे रामास्वामी यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
सध्या ओहायोचे राजकारणात मोठ्या बदलाची आशा व्यक्त केली जात आहे. जेडी वेंस यांची उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओहोयमध्ये राजकीय पोकळी भरुन काढण्यासाठी रामास्वामींची निवड झाली आहे. ट्रम्प, एलॉन मस्क यांसारख्या दिग्गजांशी त्यांचे निकटचे संबंध निवडणुकीसाठी गेमचेंजर ठरु शकते. शिवाय रामास्वामी यांची निवड, अमेरिकेतील नेतृत्त्वात वाढत्या भारतीय वंशाच्या एक मोठा पुरावा मानला जात आहे.