US Iran Conflict : युद्ध थांबले? ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली, दिला 'हा' कडक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन एपिक फ्युरी पूर्णपणे संपुष्टात आले आहे. पाकिस्तान आणि इतर मित्र राष्ट्रांनी केलेल्या विनंतीवरुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. इराणती नौदल क्षमता पूर्णपणे नष्ट झाली असून त्यांच्याकडे प्रत्युत्तर देण्याची कोणतीही ताकद उरलेली नाही असा दावाही करण्यात आला आहे. रुबियो यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणच्या ७ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. यामुळे व्यापारी जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. त्यांच्यावरील कारवाई शांततेसाठी थांबवण्यात आली असून युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास, गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच इराणमधीन नागरी असंतोषावर बोलताना त्यांनी इराणी जनता नव्या बदलासाठी उत्सुक असल्याचे म्हटले.
तसेच होर्मुझमध्ये इराणची नाकबेंदी सुरुच राहणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी अमेरिकेन विमानांनी गस्त सुरुच ठेवली आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे. युद्ध थांबवण्याचे संकेत मिळताच कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकी कच्ची तेलाचे दर २.१८% वरुन १००.०४ डॉलर प्रति बॅरलरवर आले आहेत.
याच वेळी संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षात झालेल्या निष्पाप नाविकांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली आहे. यूएनने इराणला जहाजावरील हल्ले आणि अवैध टोल वसूली थांबवण्याचे संकेत दिले आहे. तसेच समुद्रात पेरलेल्या सुरुंगाची माहिती न दिल्यास इराणवर कठोर निर्बंध लादले जातील असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.






