
From Newborn to Dog Rescued from Earthquale Venezuela
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे अनेक बहुमजली इमारती कोसळल्या असून लोक मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. हजारो लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. बचाव पथके, लष्कर, स्थानिक नागरिक मिळून शोधमोहिम राबवत आहेत.
दरम्यान एका कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखालून एका लहान मूलाला जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. बचाव अधिकाऱ्यांनी अत्यंत सुखरुपणे मुलाची सुटका केली आहे. यामुळे लोकांमध्ये एक आशेचा किरण आणि जल्लोष पाहायला मिळाला आहे. मुल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पाहून बचाव पथकांनी देखील एकमेकांना आनंदात मिठी मारली आहे.
याशिवाय बोलिव्हेरियन नॅशनल पोलिस आणि काही सुरक्षा यंत्रणांनी देखील एका नवजात बालकाला आणि १२ वर्षीय मुलाला सुखरुप वाचवले आहे. अनेक तास ढिगाऱ्याखाली अडकूनही दोन्ही मुलांचा जीव बचावल्याने याला चमत्कार मानले जात आहे.
DOS MILAGROS En medio de la tragedia del terremoto en Venezuela: El rescate de un bebé de meses, y el de un perro callejero, ambos atrapados entre los escombros. Vivos, 24 horas después del fuerte sismo. pic.twitter.com/gzKMPM5Fvm — ChivasYCrónicas (@ChivasYCronicas) June 26, 2026
माणसांसोबत प्राण्यांनाही वाचवण्याचे प्रयत्न बचाव पथके करत आहेत. यावेळी ढिगाऱ्याखाली अडजकलेल्या एका पाळीव श्वान जिवंत आढळ्याने त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बचाव कर्मींनी त्याला पाणी पाजले आणि उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या बचाव कार्य अविरत सुरु असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण संकटात वाचणार प्रत्येक जीव लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
💔🌎 Amid the tragedy of Venezuela’s devastating earthquake, rescuers pulled a frightened puppy alive from the rubble in Caracas. pic.twitter.com/hVG9JKTpgx — The Knight News (@Knight981311) June 25, 2026
Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यूचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर