Air India Bombing : अखेर कॅनडाची कबुली! 1985 च्या विमान बॉम्बस्फोटामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचाच हात; ४१ वर्षानंतर सत्य आलं समोर
Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर
२३ जून १९८५ रोजी एअर इंडियाचे विमान कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथून मुंबईला रवाना झाले होते. या विमानाचा प्रवासा मॉन्ट्रियल-लंडन-नवी दिल्ली या मार्गावरुन होणार होता. परंतु विमान आयर्लंडच्या हवाई हद्दीत सुमारे ९४०० मीटर उंचीवर असताना मोठा बॉम्बस्फोट झाला आणि विमान अटलांटिक महासागरात कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील ३२९ प्रवाशांचा बळी गेला होता. मृतांमध्ये ८२ मुले आणि चार नवजात बालकांचाही समावेश होता.
या स्फोटानंतर कॅनडा २३ जून हा दिवस दहशतवाद्यांच्या बळींसाठी राष्ट्रीय स्मृतिदिन म्हणून साजरा करु लागला. टोरंटटो, व्हॅंकुव्हर, मॉन्ट्रियल आणि ओटावा यासारख्या कॅनेडियन शहरांमध्ये स्मारकेही उभारण्यात आली आहे. दरम्यान या स्फोटानंतर भारताने यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा दावा केला होता. मात्र, कॅनडाने याची कबुली दिली नव्हती. पण, अखेर ४१ वर्षानंतर कॅनडाने भारताच्या दावा अधिकृतपणे स्वीकारला आहे.
कॅनडाच्या गुप्तचर संस्था कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) ने सोशल मीडियावर पोस्ट करत याची कबुली दिली. या पोस्टमध्ये कॅनडाने एअर इंडियाच्या बॉम्बस्फोटात खलिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे मान्य केलं. या हल्ल्याचा आरोप खलिस्तानी संघटना बब्बर खालसावर आहे.

CSIS Canada Post
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देखील या हल्ल्याचे देशातील सर्वात घातक दहशतवादी हल्ला म्हणून केले आहे. त्यांनी दहशतावादाविरोधात कठोर भूमिका ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. एअर इंडिया विमानात स्फोट होण्याच्या एक तास आधी जपानच्या टोकियो विमानतळावरही स्फोट झाला होता. या स्फोटातही बब्बर खालसा या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे.






